शिरपूर येथे प्रभाग ९ येथे समादेशक संजय पाटील यांचे मार्गदर्शन व होमिओपॅथी गोळ्या२००० पाकीट वाटप



शिरपूर (प्रतिनिधी) - येथील प्रभाग क्र. ९ येथे आयुष मंत्रालयाने सुचविलेले कोरोना प्रतिबंधक (रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी) होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 हया रोग प्रतिकार शक्ती गोळ्यांचे मोफत वाटप SRPF गट क्र. ६ चे समादेशक संजय पाटील (SP धुळे) यांनी वाटप केले.
S P संजय पाटील व डॉ. सुनिल ईशी यांनी कोरोना ह्या महामारी विषयावर जनजागृती पर मार्गदर्शन केले. 
प्रभाग क्र. ९ येथे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, नगरसेविका सौ. छाया शामकांत ईशी, शामकांत ईशी व श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ, म.फुले विधायक मंडळ व प्रांतिक तेली समाज युवक आघाडी यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशीराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, युवानेते तपनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
शहरातील प्रभाग ९ येथील चौधरी गल्ली व माळी गल्ली येथे राज्य राखीव बल गट क्र ६  चे समादेशक संजय पाटील यांनी कोरोना ह्या आजारावर महामारी विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करून त्यांच्या मार्फत रोग प्रतिकार शक्ती होमिओपॅथी गोळ्यांचे २००० पाकीट वाटप करण्यात आले.
यावेळी समादेशक संजय पाटील डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील ईशी व पोलिस हवालदार अविनाश चंद्रा यांनी कोरोना महामातीविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करून उपायांसाठी पाच सूत्री योजना समजावून ह्या औषधाचे महत्व सांगून ते घेण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण यांनी तर आभार शामकांत ईशी यांनी मानले.
याप्रसंगी  एसआरपीएफ चे सहाय्यक समादेशक एन.एन.सोलंके, कामांडन्ट सहाय्यक सदाशिव पाटील, पो कॉ अविनाश चंद्रा, जे. एस. चौधरी, जगन्नाथ ईशी, खुशाल नाना चौधरी, नारायण चौधरी, निंमराज चौधरी, राजेंद्र चौधरी, मर्चंट बँक संचालक राजेश भंडारी, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष संदीप माळी, जयेश महाजन, एन एच महाजन, राजू खाटीक, सादिक खाटीक, तनविर खाटीक, फारूक खाटीक, महेश चौधरी, आशिष चौधरी, दुर्गेश चौधरी, प्रकाश चौधरी, दिनेश चौधरी, आकाश चौधरी, जयेश चौधरी, मयूर ईशी, भटू चौधरी, सोहन चौधरी, चेतन चौधरी, प्रकाश चौधरी, प्रतीक ईशी, भरत लोहार, राहुल फुलारी, पवन माळी, किशोर चव्हाण, राहुल माळी, भटू माळी, भिका चौधरी, बापु माळी, प्रमोद मगरे, गजानन मगरे, मंसाराम माळी, राजू चौधरी, सोहन चौधरी, नरेंद्र चौधरी, दीपक माळी, जितेंद्र जैन, ऍड. संतोष वाणी, युसूफ रंगरेज, प्रवीण चौधरी,
उत्तम चौधरी, गणेश चौधरी, राजू चव्हाण, आबा बडगुजर, विजय कुंभार, राहुल सोनार, दिनेश भोई, हेमंत चौधरी, विकास कुंभार, ईश्वर चौधरी, सुरेन्द्र चौधरी, पिंटू धोबी, विनायक पाटील, लखन मराठे, सागर शाह, ललित जैन, गणेश सोनार, मयूर शिंपी, राज चौधरी यांचे सह शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी एवढी मोठी गर्दी असूनही सोशल डिस्टनसिंग ठेऊन कार्यक्रम यशस्वी झाला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने