शिरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या प्रादुर्भाव वराज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव व संकट रोखण्यात सरकार अपयशी शिरपूरात भाजपा तर्फे निषेध संकट रोखण्यात पुर्णत: अपयशी ठरले असुन आरोग्य व्यवस्था पुर्णत: कोलमडली आहे याचा निषेधारार्थ महाराष्ट्र बचाव आंदोलनांतर्गत शिरपूर भारतीय जनता पार्टी तर्फे दि. 22 मे रोजी येथील भाजपा कार्यालय आवारात आ. काशिराम पावरा, धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा नेतृत्वाखाली काळा मास्क लावुन निषेध व्यक्त करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार जागे व्हा भोंगळ कारभार बंद करा, महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र वाचवा, कोरोना ग्रस्तांच्या उपचाराची व्यवस्था करा त्वरित करा मोफत करा, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार असंघटित कामगार, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, छोटे दुकानदार यांना 50 हजार कोटीचे पॅकेज द्यावे. अश्या विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील हे उपस्थित होते. तर जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जिल्हा कोषध्यक्ष आबा धाकड, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, सुरेंद्र उदेसिंग राजपूत (युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिरपूर)शहर उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर चिटणीस राधेश्याम भोई, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई, माजी शहर सरचिटणीस सुनिल चौधरी, हिरालाल कोळी, विनायक कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्तेंनी आप आपल्या घरी निषेध व्यक्त केला.
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव व संकट रोखण्यात सरकार अपयशी शिरपूरात भाजपा तर्फे निषेध
byMahendra Rajput
-
0
