नंदुरबार -जिल्ह्यात सहा कोरोना मुक्त तर ; बामखेडाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह सहा रुग्ण कोविड संसर्गमुक्त होऊन घरी परतले



कल्पेश राजपूत -

बामखेड़ा- कोरोना च्या एक रुग्ण बामखेडा त त ता शहादा येथे आढळला असून खबरदारी म्हणून मीरा नगर हा भाग प्रशासनाने सील केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,एक वय(52)किडनी रोगाने त्रस्त रुग्ण नाशिक येथील खाजगी रुग्णालयात बामखेड़ा येथून दि 9 ला नेण्यात आले.त्या नंतर तेथे तपासणी केले असता त्या रुग्नाच्या अहवाल हा कोविड 19 पॉजिटिव आला असून त्यामुळे प्रशासन हादरले आहे .त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे व त्या व्यक्ति व कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची प्रशासनाद्वारे उशिरापर्यंत तपासणी करण्याचे काम सुरु आहे. कुटुंबातील 9 ते 10 व्यक्तिचे स्वब नमूने घेण्याचे काम सुरु आहे व त्याना होम क़्वारेंटाइन करण्यात येऊन ग्रामपंचायत वतीने पूर्ण गावात खबरदारी  म्हणून उपाय योजना करण्यात येत आहे.यावेळी सारंगखेड़ा पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सरोदे,वडाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ मोहने  व त्यांचे पथक तसेच पोलिस पाटील डॉ योगेश चौधरी ,सरपंच  लीना चौधरी  आदि च्या वतीने परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.

सहा रुग्ण कोविड संसर्गमुक्त होऊन घरी परतले

नंदुरबार दि.15-जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांचे अखेरचे दोन कोविड_19 चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असून संसर्गमुक्त झाल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इतर 31 व्यक्तींचे अहवालदेखील निगेटीव्ह आले आहेत.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.राजेंद्र चौधरी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वी 9 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून 10 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी चार रुग्णांचे 14 दिवसानंतरच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात शहादा येथील तीन पुरुष (वय 40, 44 आणि 48) आणि दोन मुलींचा (वय 12 आणि 15) समावेश आहे, तर अक्कलकुवा येथील एका पुरुषाचा (वय 58 ) समावेश आहे.

 जिल्हा रुग्णालयाच्या  विलगीकरण कक्षात या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वेळेवर संसर्गाचे निदान झाल्याने उपचाराअंती रुग्ण संसर्गमुक्त होत आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले असून इतरही रुग्ण लवरच संसर्गमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

जिल्हा प्रशासनाने संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला असून नागरिकांना संसर्ग टाळण्याबाबत आवाहनही सातत्याने करण्यात येत आहे. या आजारावर कोणतेही औषध सध्या उपलब्ध नसून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सहा फूटाचे अंतर ठेवून विषाणूची श्रृंखला तोडणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊन येथील  इतर व्यवहार सुरळीत होऊ शकतील. त्याचबरोबर विषाणूचा प्रभाव  आणखी काही काळ राहणार असून संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने