थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे किरकोळ कारना वरून चौघांना आरोपींनी लाकडी खाटेच्या दाडक्याने व गुप्तीने वार करून गंभीर जखमी केले आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली आहे. पोलीस स्थानकात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार १८/५/२० रोजी ८.३०वाजेच्या सुमारास फिर्यादी उषाबाई हिम्मत देवरे रा. थाळनेर हे त्यांच्या सुने सोबत नैसर्गिक विधीसाठी जात असताना आरोपी कैलास ,राजेंद्र ,अमोल यांनी त्यांच्या अंगावर सिगारेटी चे धूर सोडले होते. या कारणावरून जा विचारला असता आरोपी कैलास राजेंद्र सोनार, राजेंद्र नथू सोनार, योगेश राजेंद्र सोनार, छोटी बाई राजेंद्र सोनार, पूजाबाई योगेश सोनार, अमोल प्रकाश कोळी, विशाल रमेश कोळी, मुन्ना संतोष कोळी, अजय विठ्ठल कोळी सर्व रा. संत गाडगे महाराज नगर थाळनेर अवनी संगनमताने फिर्यादी व तिची सुन व मुलांना लाकडी खाटेच्या चने व गुप्तीने वार करून जखमी केले. तसेच यावेळी जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
यातील जितेंद्र हिम्मत देवरे याच्यावर गुप्तिने पाठीवर व डोक्यावर वार केल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यास थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यास पुढील उपचारार्थ शिरपूर येथे हलविण्यात आले होते.इतर जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले.याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात वरील नऊ आरोपी विरोधात गु.र.न.३६/२० 307,143,147,148,149,509,324,427 सह अनु.जाती - जमाती कायदा कलम 3 (1)(R)(S)व 4 (1)(R)(S) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून तपास विभागीय पोलिस अधिकारी माने यांच्याकडे आहे.
