जशन भूमकर { गायक } याची मुलाखत



दीनानाथ घारपुरे, मुंबई
आजच्या पिढीचा तरुण गायक, शास्त्रीय संगीताची आवड बालपणापासून निर्माण झाली,, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वराचा प्रभाव बालमनावर झाला, आणि त्याचा प्रभाव कायम स्वरूपी झाला, आणि शिक्षणाला सुरवात झाली ,, परदेशात शिक्षण घेत असताना तेथे पहिला कार्यक्रम सादर केला ,,,, त्यांचा पुढचा प्रवास आमचे प्रतिनिधी दीनानाथ घारपुरे यांनी जाणून घेतला,,,

मला सुरुवातीला सांग की तुला संगीताची आवड कशी निर्माण झाली ?

          संगीताची आवड मला जन्मापासूनच होती असं म्हणायला हरकत नाही कारण माझ्या आयुष्यात मला असा कोणताच काळ लक्षात येत नाही आहे की ज्यामध्ये संगीत माझ्याकडे नव्हते किंवा मी संगीतात नव्हतो,, माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी पंडित भीमसेन यांच्या कार्यक्रम पूर्ण ठाणे शहरासाठी आयोजित केला होता,, तेव्हा पंडित भीमसेन जोशी यांनी मला त्यांच्या मांडीवर घेऊन  पडदा उघडला आणि आपला कार्यक्रम सादर केला,,, तर ते सूर कानावर पडले आणि जसा मी मोठा होत गेलो,, पण माझे सर्व लक्ष त्या गाण्यांमध्ये केंद्रित झाले होते,, हिंदी गाणी गुणगुणत असे,,,  टीव्हीवरचे संगीतावरचे कार्यक्रम बघायचे,, रेडिओ वर कुठलेही गाणं वाजलं कि,,मी ते म्हणण्याचा प्रयत्न करीत असे,, यावेळीसुद्धा रेडिओवर एखादे शास्त्रीय संगीत ऐकवा हे मला अधिक ऐकण्याचा मोह व्हायचा,, इतर गाणी सुंदर आहेतच पण हे शास्त्रीय संगीत काहीतरी अलौकिक आहे, असं मला जाणवायचं,,, माझ्या मनावर त्याचा परिणाम खूप सकारात्मक होत गेला,, त्या गाण्यातील मला त्यावेळी काही कळायचे नाही पण त्याचे सूर मनावर खूप चांगले परिणाम साधून जात होते ,, त्यावेळेपासून शास्त्रीय संगीत शिकावं असं मला वाटायला लागेल आणि मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली जेव्हा मी चौदा पंधरा वर्षाचा होतो त्यावेळी प्रथम गानसरस्वती किशोरिताई अमोणकर  यांचे गाणे ऐकले त्या सुरांनी आणि वातावरणाने मी भारावून गेलो,,, माझ्या मनावर एक ठसा उमटला,, त्यामुळे माझे  शिक्षण घेत असताना मी शास्त्रीय संगीत शिकायचं हे तेव्हाच नक्की केले,,, आणि शास्त्रीय संगीत शिक्षण घ्यायला सुरुवात केली,,, 

संगीतामधील प्रकार  तुम्हाला कुठले आवडतात ? 

          खरं सांगायचं तर सगळ्याच प्रकारचे संगीत आवडते माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण हे परदेशात झालं,,,, चार वर्ष मी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये होतो,, एक वर्ष मी लंडन मध्ये होतो, तर यामुळे मी मला वेळ मिळाला की मी संगीत ऐकत असे,,, त्यामुळे मला संगीत ऐकायला जास्त आवडते कारण प्रत्येक संगीतामध्ये काही तरी सौंदर्य आहे,,, कारण तुम्ही जे मनापासुन सादर करता,,, ते लोकांना नक्कीच आवडतं,,,,  माझा अभ्यास हा शास्त्रीय संगीताचा जास्त आहे,, सूर, काव्य, आणि लय  या सगळ्याचा सुवर्णमध्य समतोल आहे तो शास्त्रीय संगीतामध्ये  आपल्याला जास्त अनुभवायला मिळतो,,,, खूप छान बंदिशी आहेत ते ऐकून सगळे कसे आनंदित होतात,, माझ्या गुरु नेहमी म्हणायच्या आपण  जेवतो,,, वरण-भात ह्याच बरोबर खूप  पदार्थ असल्याने जेवण पूर्ण झाल्याचे समाधान मिळते,,, तर प्रत्येक पदार्थाची जागा आहे,,,,

आपण सगळ्याचा काही प्रकारचे गायन सादर करतो,,, किंवा सादर करू , त्यामध्ये सुद्धा प्रभुत्व असायला पाहिजे,  यासाठी अधिक प्रयत्न आणण्याचा प्रयत्न करायला हवा आणि मी तसा प्रयत्न करतो आहे,,, त्याची फळ मिळायला वेळ लागेल माझा शास्त्रीय संगीताच्या बरोबरच गझल, अभंग गायन याचा अभ्यास सुरू आहे,,, 

सुरुवातीचा कार्यक्रम कुठे झाला सुरुवात कशी झाली   ?

         मी अठरा वर्षाचा होतो त्यावेळी मी इंजीनियरिंग शिक्षण करायला अमेरिकेत गेलो होतो,,  त्यावेळी माझी शास्त्रीय संगीताची तालीम  योगिनी धोंडू ताई कुलकर्णी यांच्याकडे मी शिक्षण घेत होतो ,, तर बाईंची इच्छा होती की मी तिथे अमेरिकेत अनेक कार्यक्रम करावे आणि आपले शास्त्रीय संगीत तिथे पोचवावे तसेच खास करून जयपूर गाण्याचं संगीत तिथे पोहोचला पाहिजे अशी त्यांची इच्छा त्यामुळे तिथे असताना अनेक कार्यक्रम केले,,,  तिथे  गाउन  मला बरेच काही शिकता आले तेव्हा मी लंडनला होतो आम्ही तेथील विद्यापीठात खूप कार्यक्रम केले त्यामुळे सुरुवातीचे कार्यक्रम माझे परदेशात झाले भारतात परत आल्यानंतर अनेक संगीत महोत्सवात दूरदर्शन व आकाशवाणी वरती कार्यक्रम झाले,,, 

तुझे गुरु कोण आहेत आणि गुरूंच्या विषयी तुझ्या भावना  अर्थात  मनोगत ,,,?  

        गुरु साक्षात परब्रम्ह असं जे म्हटले आहे ते अगदी बरोबर आहे शास्त्रीय संगीतामधील माझ्या गुरुविषयी बोलावं जितके बोलावे तितके कमीच आहे,,, गुरु हे  आपल्याला कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून घडवत असतात असं मला वाटतं सुरुवातीचे शिक्षण हे पंडित सीए आगरकर हे माझे काका आजोबा आहेत त्यांच्याकडे झाले,,, आणि त्यांनी पण जयपूर घराण्याचा अभ्यास केला आहे,,, त्यानंतर गान  योगिनी श्रीमती धोंडू ताई कुलकर्णी यांच्या जयपूर घराण्याचा शास्त्रशुद्ध गायकीचा अभ्यास आहे जयपूर घराण्याची मूळची ओरिजनल जी गायकी आहे ते जाणाऱ्या त्या एकमेव होत्या,,, त्यानंतर एक दोन ,,, वर्षानंतर मी गानसरस्वती किशोरिताई  अमोणकर,, यांच्याकडे गाणं शिकलो,, त्यानंतर मी पंडित संजीव चिमलगी यांच्याकडून आवाज साधनाचे शिक्षण घेत आहे ,, त्याचप्रमाणे पंडित रघुनंदन पणशीकर आणि श्रीमती माया उपाध्याय यांच्याकडून मी मार्गदर्शन घेत असतो,,,,

खासकरून कोणत्या घराण्याची तालीम  घेतो आहेस ? ,,,

           खास करून माझी तालीमही जयपूर घराण्याची झालेली आहे,,,  गाणी ऐकताना मी सगळेच गाणी ऐकतो,, वेगवेगळ्या घराण्यांची सुद्धा मी गाणी ऐकतो त्यांचेही गायन ऐकायला मला आवडतं कारण प्रत्येकाकडून मला काहीना काही शिकायला मिळाले आहे ,, जुने गायक आणि आत्ताचे गायक कलाकार सगळ्यांचे मनापासून ऐकतो,,,,,,,, जयपूर घराण्यांनी मला निर्गुणी असा संस्कार दिला आहे ,,,,  म्हणून माझ्या गायकीमध्ये जयपूर घराण्याचा प्रभाव जाणवतो,,, 

आजचे संगीत याविषयी काय सांगाल ? 


           आजच्या जीवनामध्ये  धकधक, धावपळ  फारच वाढली आहे त्यामुळे लोकांना कुठेतरी शांती पाहिजे,, ती शास्त्रीय संगीतामध्ये मंडळी शोधत असतात,, त्यामुळे आज शास्त्रीय संगीत अनेक ठिकाणी ऐकले  जाते आमच्या इंजीनियरिंग इंडस्ट्रीमधील लोकांनी पूर्वी कमी प्रमाणात शास्त्रीय संगीत ऐकलं,,,,पण आता  ताण कमी करण्यासाठी ही मंडळी घरी शास्त्रीय संगीत मुद्दामून  ऐकतात त्यावेळी चे शांतता देणारी गाणी जी शास्त्रीय रागावर आधारित आहेत आणि खास करून शास्त्रीय बंदिशी याचा ते जास्त आस्वाद घेतात,,,, लोकांना कुठेतरी शांतता हवी आहे,, त्यामुळे शास्त्रीय संगीत यामधून ती त्याला मिळते ह्या संगीतामधून मनाला शांती मिळाल्याने त्यांच्या मनामधील समस्यांचे उत्तर सुद्धा त्यांना मिळतात सूर ताल आणि राग यापलीकडे जे संस्कार आहेत ते संस्कार सुद्धा या संगीतामध्ये आहेत शास्त्रीय संगीत ऐकून याची जाणीव अनेक मंडळींना झालेली आहे अशी उदाहरणे माझ्यासमोर खूप आहेत,,, 

आजच्या युवकांना तू नक्की काय सांगशील ?

         आजची  आमची जी पिढी आहे त्यांना आज फारसं काही सांगायला लागत नाही,, ही मंडळी सगळी हुशार आहेत,,, अभ्यासू आहेत ,, ती आज संगीत शिकत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे,,, आपण जे शिकलो ते व्यक्त करायला यामागची तयारी आणि मेहनत हे आजचे युवक घेत असतात,,,,  शास्त्रीय संगीत हे आज शिकलो की उद्या यावे अशी गोष्ट नाही,,शास्त्रीय संगीत हे चिरतरुण आहे कायमचे ते राहणार आहे,, या शास्त्रीय संगीताला वेळ द्यायलाच लागतो, त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते ,जे कायम स्वरूपी आहे त्याचा  रियाज करायलाच  पाहिजे,,,, वर्षानुवर्ष तुम्हाला प्रत्येक रागाची तालिम नियमितपणे करायला पाहिजे,,,  असे मी युवकांना सांगीन,,,,


दीनानाथ घारपुरे ९९३०११२९९७ 

 

Virus-free. www.avast.com

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने