पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सुमारे ५०० फेस शिल्ड वाटप,भारतीय जनता युवा मोर्चा चा उपक्रम




धुळे -
आज जनतेच्या सेवेसाठी,नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलीस कर्मचारी अधिकारी रस्त्यावर तैनात आहेत.संचारबंदीच्या या कालावधीत संपूर्ण शहराची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे.त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून यशवर्धन कदमबांडे यांच्या संकल्पनेतुन शहरातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सुमारे ५०० फेस शिल्ड वाटण्याचे मानस होते.त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात धुळे शहरातील स्थित धुळे शहर पोलीस ठाणे आझादनगर पोलीस ठाणे तसेच चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे सुमारे २५० फेस शिल्ड पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस निरीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले होते.धुळे शहरात एकूण ६ पोलीस ठाणे आहेत.आज उर्वरित ३ पोलीस ठाणे ज्या अंतर्गत देवपुर पोलीस स्टेशन, मोहाडी उपनगर पोलीस स्टेशन  तसेच ए.सी.बी च्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुमारे २५० फेस शिल्ड संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.या वेळी देवपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.सानप साहेब, मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मा.संगीता राऊत मॅडम, देवपुर पोलीस स्टेशनचे मा.कोठावदे साहेब आणि ए.सी.बी चे सोनार साहेब यांच्या कडे आज फेस शिल्ड  सुपूर्द केले.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने