अखेर ग्रामसेवक अमोल भदाणे वर गुन्हा दाखल , निर्भीड विचार चा पाठपुरावा ..




शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत नांथे या ग्रामपंचायतीत पदावर कार्यरत नसतांना रुपये २,८०,००० परस्पर काढून घेतल्या प्रकरणात ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय शामराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला आहे . 
याबाबत सविस्तर वृत्त असे की , ग्रामसेवक अमोल सुभाष भदाणे यांची गटविकास अधिकारी शिरपूर यांनी ग्रामपंचायत नांथे येथे तात्पुरती नियुक्ति केली होती . यानंतर ग्रामपंचायत चाकडू येथील अपहार प्रकरणात त्यांना निलंबित करम्यात आले होते . सदर प्रकरणात मागील आठवड्यात ४२,४२,००० रुपयांच्या अपहार प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नांथे ग्रामपंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक के . ए . बडगुजर यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता . मर्यदित काळा साठी अमोल भदाणे यांच्या कडे नांथे चा कारभार देण्यात आला होता .मात्र सरपंच नांथे यांनी  ६  फेब्रुवारी २०२०रोजी ग्रामपंचायत खात्यावर चौदाव्या वित्तआयोग मधून जमा झालेली रक्कम रुपये २,८०,७८१ यातून २,८०,०००रुपये ची रक्कम ग्रामसेवक अमोल भदाणे यांची बदली झालेली असतांना व ते ग्रामपंचायतीवर कार्यरत नसतांना परस्पर बँकेतून काढून घेतले होते . अशी तक्रार नांथे ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांनी केली होती . याबाबत चौकशी झाली असता ,असे निदर्शनास आले की , ग्रामसेवक अमोल भदाणे यांनी परस्पर रक्कम RTGS द्वारा विजय ईश्वर भालेराव यांच्या खात्यावर जमा केली होती . याबाबत ग्रामसेवक यांनी नांथे सरपंचांची दिशाभूल करून खोटी सही आणि शिक्का चा वापर करून अपहार केल्याची तक्रार सरपंचांनी केली होती . यानंतर चौकशी झाली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला . सदर प्रकरण परस्पर मिटवण्यासाठी ग्रामसेवक भदाणे यांनी २,६०,००० रुपयांची रक्कम सरपंच यांना देऊन  ग्रामपंचायत खात्यावर जमा करून , प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला . यादरम्यान निर्भीड विचार चे संपादक महेंद्र जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करून ग्रामसेवकाला कायमचे बरखास्त करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली . त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन वरिष्ठांना अहवाल सादर केला असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर ग्रामसेवकावर  गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले होते . त्यानुसार विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामसेवक अमोल भदाणे व विजय ईश्वर भालेराव यांचे विरोधात अपहार आणि अफरातफहर केल्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर ००७८ अनुवये भादवी कलम ४२०,४०६,४०९,४६७,४६८,४७१आणि ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने