व्यथा बळीराजाची




काय सांगु व्यथा 
अपूर्ण पडतील गाथा 
कष्ट दिनरात राहता 
 देऊन उरलेले खाता... 

गाई म्हशी धुता 
दुध लोकांना देता 
बादली पाण्याने धुवुन 
तेंच घरी नेता... 

रात पहाट करता 
ढेकळं सारी फोडता 
रान हिरवं बघता 
पिकवुन घरी नेता... 

व्यापारी फुकट घेता 
जीवनावश्यक वस्तु सांगता 
सरकारी कवडीमोल किंमत 
सारीच यांना फसवता....

सारी लुटारू लुटता 
यांच्यावर पोट भरता 
ओरबाळून यांना घेता 
कोरडं नियमित खाता... 

असतो दयायचा बळी 
वरवर सारी गोंजारता 
राजा यास बोलुन  
हळुहळु घाव घालत मारता..... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा 
जिल्हा. जळगाव 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने