सीएए ग्रुप शिरपूर तर्फे चार हजार रुग्णांना होमिओपॅथिक औषध वाटप

  
  शिरपूर प्रतिनिधी   
 सामाजिक व राष्ट्रीय  कार्यात नेहमी  सामाजिक बांधिलकी जपून शिरपूरात कार्यरत असणाऱ्या  सीएए या ग्रुप तर्फे   वैद्यकीय अभियानाअंतर्गत   शिरपूर तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकारमान्य होमिओपॅथिक औषध वाटप कार्यक्रम आज दिनांक 7 मे रोजी सकाळी  8 वा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केला होता
 सरपंच सौ हर्षाली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा रुग्णालय शिरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ध्रुवराज वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत  गावातील नागरिकांना औषध वितरित करण्यात आले  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीए ग्रुपचे  पदाधिकारी व डॉक्टर क्लब चे अध्यक्ष डॉक्टर योगेश जाधव यांनी असिनिक अहबम 30  हे होमिओपॅथिक औषध भारत सरकारच्या आयुष्य मांत्रालयाने शिफारस करून केलेल्या मानकाप्रमाणे वितरित केले जात असल्याचे नमूद केले  आमोदे गावाच्या रहिवाशी  असल्याने सामाजिक ऋणानुबंध हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्याची सांगितले डॉक्टर ध्रुवराज वाघ यांनी आजाराला घाबरून न जाता घेऊन मास्क लावून पाळून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले डॉक्टर योगेश जाधव यांनी वैयक्तिकपणे 4000 नागरिकांसाठी जवळपास 723 पेक्षा अधिक कुटुंबाना मोठ्याप्रमाणावर  मोफत औषध उपलब्ध करून दिल्याचे गौरव उद्गार काढून सीए ग्रुपची  प्रशांत केली  या ग्रुपचे पदाधिकारी सदस्य अडवोकेट सुहास वैद्य यांनी आमोदे  गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने या गावातील प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना औषध देणार स्पष्ट केले या ग्रुपचे राजेश मारवाडी यांनी या आजारावर लस व औषध उपलब्ध नसल्याने यावर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी  नागरिकांनी गांभीर्यपूर्वक वेळेवर औषध घेण्याचे आवाहन केले.
या ग्रुप मध्ये सर्वसमावेशक अशा समाजातील सर्वच क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश असून यांच्या माध्यमातून सदरचा उपक्रम राबविला गेला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी अँड.सुहास वैद्य,डॉ योगेश जाधव, तुषार जाधव,साईकृपा मेडिकल,अंकित शेवाळे,गोपाळ मारवाडी, अमोदा गावचे सरपंच ,सदस्य ,राज देशमुख, गावकरी व सि ए ए ग्रुपचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने