धुळे - काल रात्रीच धुळे जिल्यासाठी चिंता वाढवणारी बाब समोर आली असून प्रशासन मात्र पार हादरले आहे शुक्रवारी तब्बल १८ रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले. एसआरपीएफ च्या सात जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुरूवारी देवपूर परिसरातील पॉजीटीव्ह आढळलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील चारजणांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. तसेच अमळनेर येथील एका व्यक्तीचेही रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. पॉजीटीव्ह आढळलेल्या १८ रूग्णांमध्ये १४ पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्याची कोरोना रुग्ण संख्या 53 वर पोहोचली आहे. एकीकडे आपले रुग्ण बरे होऊन परत येत असताना दिलासा मिळत असताना अचानक जिल्यासाठी अप्रिय बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता अधिक सावध राहून नियम पाळण्याची गरज आहे.
धुळ्यात नवीन १८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 53 वर,कोरोना चे सावट गडद
byMahendra Rajput
-
0
