टोल कर्मचारी देखिल कोरोना वारीयर्स, 50 लाखांचा विमा द्या, टोल कर्मचारी व माहिती अधिकार महासंघ कार्यकर्त्यांची मागणी



धुळे -  सद्या देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून या जैविक युद्ध जन्य परिस्थितीत टोल कर्मचारी जोखीम घेवून काम करत आहेत म्हणून टोल कर्मचारी देखिल कोरोना वरीयर्स आहेत व त्यांना 50 लाखांचा विमा द्या अशी मागणी टोल कर्मचारी व माहिती अधिकार महासंघ कार्यकरता गणेश वाडेकर यांनी केली आहे.

 यात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याना निवेदन सादर केले आहे की Covid-19 हे अल्पकालीन प्रकरण आहे हे कर्मचारी समजून  आहेत. व  जास्तीत  जास्त काळ हे सुरू राहणार हे देखील समजून आहेत .  परंतु कर्मचारी स्वतः त्रास  घेण्यास  पण  सक्षम  आहेत. कारण की कर्मचारी आज ना उद्या कामावर रुजू  होणारच आहे हे कर्मचारी मान्य ही करतात.
  टोल प्लाझा  सध्याच्या काळात अर्थव्यवसंस्थे  साठी  अत्यन्त  आवश्यक  असलेली  बाब आहे .  मात्र आरोग्य सेवेसारख्या अन्य क्षेत्राच्या तुलनेने    टोल  कर्मचाऱ्यांना धोखा जवळजवळ अपेक्षणीय नाही असे आपले मत आहे.

आरोग्य  क्षेत्रातील  कर्मचारी किंवा डॉक्टर ला माहिती असते की त्यांना पेशंट ला हँडल करायचे आहे ते तश्या प्रकारे काळजी घेतात /व घेऊन सुद्धा अप प्रकार घडले आहेत . 
टोल कर्मच्याराला होतो हात आदान प्रदान पैसे घेणे देणे होत असते त्यामुळे तो संक्रमित होऊ शकतो.

चांदवडच्या टोलनाक्यावर कर्मचारी बाधीत झाला असतानाही याशिवाय थुंकी लावून टोलचे चलन भरण्याचा घृणास्पद प्रकार घडत असल्याने कामगार प्रशासनावर  संतप्त  आहेत.  प्रशासन कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत. 
चांदवडचा टोल प्लाझा या ठिकाणी काम करणारा एक कर्मचारी एप्रिल मध्ये  कोरोनाचा  शिकार  झाला  होता.  वास्तविक एखाद्या  परिसरात  कोरोनाचा  रूग्ण  आढळला  तर  तो  परिसर सील केला जातो.  रूग्णालयात  कोरोनाबाधीत रूग्णाने उपचार घेतल्याचे  निष्पन्न  झाले  तर  रूग्णालय  सील  केले  जाते.  या ठिकाणी  काम  करणारा  कर्मचारी कोरोना बाधीत सापडल्यानंतर  हा  प्लाझा  बंद  करणे अपेक्षित  होते  हे एकुणच चांदवडच्या टोलनाक्यावर कोरोनाची दहशत  पसरलीय.  थुंकीतून हा विषाणू संक्रमीत  होतो  अशी  धारणा रूढ असल्याने  थुंकी  लावलेल्या चलनाने कामगारांच्या मनात संक्रमणाची भिती दबा धरून आहे.  यातूनच हा प्लाझा बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्यमंञी , राष्ट्रीय  महामार्ग प्राधिकरणासह केंद्रीय रस्ता वाहतुक  मंञालयाला  इ मेल द्वारे केली आहे.

सदर  निवेदनाच्या विषयाचा नुकताच अनुभव देखील नवापूर सीमा तपासणी नाक्यावरचे १६ कर्मचारी ‘क्वारंटाईन’वृत्तावरून समजते. नवापूर तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणीवर तैनात आरोग्य सहाय्यक  धुळे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आल्याने कर्मचऱ्यांसह नाक्यावरचे १६ कर्मचारयांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन करत त्यांचे स्वॅब घेतले असून संबधित आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतरांचे स्वॅब नमुने घैत त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. सदरची बाब ही गँभीत असून  राहुल भारती  यांनी  दिलेल्या  निवेदनाचा  जिल्हाधिकारी यांनी तत्काळ विचार करून  संबंधितांना  योग्य  त्या  सूचना कराव्यात अशी मागणी आहे.

    देवा कृपेने असे अनावधानाने वाईट घटना झालीच तर  संबंधित कर्मचारी आणि  त्यांच्या  पश्चात त्यांच्या कुटुंबियांना काय मोबदला मिळणार यांची देखील  काही स्पष्टता  NHAI  ने  घोषित  केली  पाहिजे .  सदरील  बाबतीत  जर  काही  गैर  प्रकार  बरे वाईट  घडले/घडल्यास  कोणत्याही  कर्मचाऱ्यच्या  जीवितास  धोखा  झाल्यास  त्यांची  संपूर्ण  जबाबदारी  ही राष्टीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) व  प्रशासनाचे  राहील व व्यवस्थापक राहतील. याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.टोल  कर्मचारी हे देशाची  आर्थिक  अर्थव्यवस्था  सुधारण्यासाठी  तर  टोल  कर्मचारी  ही  कोरोना वॉरियर्स  बनण्यास  तयार  आहे.

  मा. निर्मलाजी सिथारमन (RES. Nirmala Sitharaman) Minister of Finance and Corporate Affairs of India यांनी जी  घोषणा  केली  की  आरोग्य  सेवक ,पोलीस , महानगरपालि चे  कर्मचारी  कर्मचाऱ्यांना  Rs 50-Lakh Medical Insurance Cover For Coronavirus Warriors: Nirmala Sitharaman  लागू केले त्याप्रमाणे  टोल कर्मचाऱ्यांना देखील रु.५० लाख मेडिकल इंश्योरेंस कव्हर लागू करावा. टोल  कर्मचारी  हे सुद्धा   कोरोना  वॉरियर्स  म्हणून देशाची अर्थव्यवस्था   सांभाळत  आहेत.

आपण  म्हणतात की टोलिंग  ऑपरेशन  सरकारी  कर्मचाच्या  तुलनेत  सुरक्षित आहे.   असुरक्षित  झाले  तर  त्याची जबाबदारी आपण  घेत असाल तर तसे लिखित स्वरूपात द्यावे व  कर्मचाऱ्यांच्या  परिवाराला  दिलासा  द्यावा.

  आपण  म्हणता  ESIS  ही पुरेशी ढाल आहे,  देवाकृपेने  काही  झाल्यास तर ढाल आहेच, पण कर्मचाऱ्यांना  स्वतः मारण्याची  कोणत्या  प्रकारची  इच्छा  नाही.   कॉविड 19  हा न दिसणारा काळ आहे. लाखो लोक मरत आहेत. माणसाचा जीव बाजारात मिळत नाही त्याच्या  परिवाराला  त्या आधारे  आयुष्य  काढायचे असते .  म्हणून कृपा करून कर्मचाऱ्यांची निंदा करू नये. कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना इतर कोरोना  वॉरियर्स प्रमाणे रु.५० लाख मेडिकल इंश्योरेंस कव्हर लागू करावा आणि त्यांच्या परिवारास दिलासा द्यावा अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने