शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यात अर्थे येथील एसआरपीएफ जवानाच्या परिवारातील दोन जण कोरोना पॉजिटीव्ह आढलेले आहेत.त्यामुळे शिरपूर ग्रामीण भागात कोरोनाने दस्तक दिल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. त्यामुळे अर्थे गाव संपूर्ण लॉक करण्यात आले असून संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.काल अमोदे येथील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने शिरपूर शहरासह परिसर तीन दिवस संपूर्ण लॉक करण्यात आला आहे. आता ग्रामीण भागातील अर्थे येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.आतापर्यंत तालुक्यात पाच कोरोना चे रुग्ण झालेले आहेत. यापैकी दोन कोरोना चे रुग्ण तंदुरुस्त झाले आहेत. तालुक्यात दोन दिवसात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील एसआरपीएफ जवानाची पत्नी व मुलीचाही खुर्द व अर्थे बुद्रुक येथील ११ कुटुंबाच्या संपर्कात आली असल्याचे बोलले जात आहे. तसेच बाजारातही खरेदीला गेली असल्याचे व , डॉक्टरांकडे तपासणीला जाणे व ती घरात सासू-सासऱ्यांच्याही संपर्कात आल्याची चर्चा आहे .त्यामुळे कोरोनाची भीती अधिक वाढलेली आहे.
दरम्यान जवानाची पत्नी व मुलगी पॉझिटिव्ह असल्याची समजताच गावात खळबळ उडाली आहे़ तर अर्थ गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
