🔴 अंतर्गत वादातून हिंसाचाराचा डाव हाणून पाडला; धुळ्यात गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरात संभाव्य गंभीर गुन्ह्याचा कट उधळून लावत स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांनी मोठी कारवाई केली आहे. अंतर्गत वादातून हल्ला करण्याच्या उद्देशाने बाळगलेला एक विना परवाना गावठी कट्टा (पिस्टल) व चार जिवंत राऊंड यांसह एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र व मा. पोलीस अधीक्षक, धुळे यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
दि. 27 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे (स्थानिक गुन्हे शाखा, धुळे) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, सुमित सुभाष शिंदे (वय 36, रा. सतीश नगर, देवपूर, धुळे)** यास ताब्यात घेण्यात आले.
आरोपी हा सुझुकी बलेनो (MH-18/BR-9103) या चारचाकी वाहनातून पांझरा नदी काठी असलेल्या संत रोहिदास गार्डन परिसरातून जात असताना पोलिसांनी वाहन अडवून झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्याकडून
एक गावठी कट्टा (पिस्टल)
04 जिवंत काडतुसे
सुझुकी बलेनो चारचाकी वाहन
असा एकूण ₹8,44,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्राथमिक तपासात आरोपीने उमर्टी (मध्यप्रदेश) येथून गावठी कट्टा व जिवंत राऊंड खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. अंतर्गत वादातून हल्ला करण्याचा त्याचा उद्देश होता. त्यामुळे भविष्यात घडू शकणारा गंभीर गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी देवपूर पोलीस ठाणे येथे
गु.र.नं. 215/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही धुळे शहर, देवपूर व आझादनगर पोलीस ठाण्यांमध्ये
भा.दं.वि., BNS तसेच म.पो.का. अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली,
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोउनि. अमित माळी तसेच पोलीस अंमलदार योगेश चव्हाण, दिनेश परदेशी, प्रल्हाद वाघ, प्रकाश सोनार, आशिषकुमार वानखेडे व अमोल पाटील यांच्या पथकाने केली.
