शिरपूरमध्ये शिवसेना (शिंदे गट)चा झंझावात; सलमान काझींसह शेकडो युवकांचा पक्षप्रवेश
धुळे | प्रतिनिधी
दिनांक ६ जून २०२६ रोजी धुळे जिल्ह्यातील दुलारी गार्डन येथे शिवसेना (शिंदे गट)ची भव्य आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ. श्रीकांत शिंदे, दादाजी भुसे, भाऊसाहेब चौधरी, आनंद परांजपे, चंद्रकांत रघुवंशी, मंजुळा गावित, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा प्रमुख सतीष तात्या महाले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
या बैठकीचे विशेष आकर्षण ठरले ते शिरपूर शहरातील युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे सलमान नूर काझी यांचा शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाहीर प्रवेश. सलमान काझी हे अल्पसंख्यांक विकास हक्क फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असून त्यांनी शिरपूर शहरातील शेकडो पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.
यावेळी मस्तुफा बोहरी, अबरार शेख, रहीम शेख, जाबीर मलक, रईस मलक, इरफान मण्यार, आरिफ मलक उस्मान, कमिल शेख, कालू दादा, नासिर हारुन बागवान, तालिब शेख, आकीब शाह, जुनेद खान, अफसर मलक, मुजाहिद शेख, अदनान सैय्यद, जैद सैय्यद, फैजान मलिक यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “येणाऱ्या काळात शिरपूर शहरात अल्पसंख्यांक विभाग मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी जे काही आवश्यक असेल ते सर्व सहकार्य शिवसेनेच्या वतीने दिले जाईल.” त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या जाहीर प्रवेशामुळे शिरपूर शहरात शिवसेना (शिंदे गट)ची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#ShivSena
#ShindeGroup
#ShivSenaShinde
#DhuleNews
#ShirpurNews
#MaharashtraPolitics
#PoliticalNews
