हिंजवडी आयटी पार्कमध्ये गॅस टंचाईचा फटका; कॅन्टीन सेवा विस्कळीत, आयटी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना

 


हिंजवडी आयटी पार्कमध्ये गॅस टंचाईचा फटका; कॅन्टीन सेवा विस्कळीत, आयटी कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याच्या सूचना

बातमी

पिंपरी-चिंचवड परिसरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम आता थेट आयटी क्षेत्रावरही दिसू लागला आहे. पिंपरीतील हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक कंपन्यांच्या कॅन्टीन सेवांवर याचा परिणाम झाला असून कर्मचाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

माहितीनुसार, गॅसच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्यांमधील कॅन्टीनमध्ये अन्न तयार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सूचना देत शक्यतो घरून डबा आणण्याचे आवाहन केले आहे. कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली असून काही ठिकाणी सेवा तात्पुरती मर्यादित करण्यात आली आहे.

हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कर्मचारी पीजी किंवा भाड्याच्या घरांमध्ये राहतात. या ठिकाणी असलेल्या मेस सेवांनाही गॅस टंचाईचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक पीजी मेस बंद पडल्या असून कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आयटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांना रोजच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Hashtags

#HinjewadiITPark

#LPGShortage

#ITEmployeesProblem

#PimpriChinchwad

#GasCrisisIndia

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने