धुळ्यात मोटारसायकल चोरट्यांवर पोलिसांचा धडाका; दोन आरोपी जेरबंद, ८ दुचाकी जप्त
बातमी :
धुळे : जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 213/2025 (BNS कलम 303(2)) या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना 5 मार्च 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्सच्या मागील रस्त्यावर सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहीद अख्तर मोहम्मद सफर अन्सारी (वय 26, रा. सुल्तानिया चौक, जे.बी. रोड, धुळे) आणि शेख मोब्बीन शेख रहीम (वय 26, रा. सलीम मुन्शी नगर, वस्ती क्र.1, मालेगाव, जि. नाशिक) अशी आहेत.
सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी मालेगाव शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबानुसार त्यांनी लपवून ठेवलेल्या एकूण ८ चोरीच्या मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
अशाप्रकारे 02 आरोपी निष्पन्न करुन, त्यांचेकड़न एकुण 3,10,000/- रु.किं.च्या एकुण 08 मोटार
सायकल हस्तगत करुन खालील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत,
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित माळी तसेच पोलीस कर्मचारी हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, संतोष हिरे, यश चव्हाण, प्रल्हाद वाघ, आशिष वानखेडे, दिनेश परदेशी आणि प्रकाश सोनार यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारसायकलींची किंमत लाखोंमध्ये असल्याचा अंदाज असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
