गो.ए.सोसायटीच्या एच.पी.टी आर्ट्स व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयात स्पंदन 2026 उत्साहात संपन्न*

 


*गो.ए.सोसायटीच्या एच.पी.टी आर्ट्स व आर.वाय.के. विज्ञान महाविद्यालयात स्पंदन 2026 उत्साहात संपन्न*

प्रतिनिधी युवराजसिंग राजपूत,नाशिक

एच.पी.टी. आर्ट्स व आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालयात "स्पंदन" २०२६  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्टेज पूजन प्रमुख अतिथी सरकार वाडा पोलीस स्टेशनचे डीसीपी मा. सुरडकर साहेब क्राईम ब्रांच व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयप्रसाद अवस्थी यांच्या हस्ते नारळ वाढवून स्टेज पूजन करण्यात आले. 

स्टेज पूजन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी प्रमुख अतिथी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी संबोधित केले. प्रमुख अतिथींनी थोडक्यात सर्व विद्यार्थी मित्रांना व पालकांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, डॉ. घनबहादूर, विद्यार्थी विकास मंचाचे डॉ. विजयकुमार वावळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मा. अनुराधा मोरे  यांनी प्रमुख अतिथींचे आभार मानले. 


विद्यार्थ्यांनी यावेळी आपली कला सादरीकरण करून कलागुणांना वाव दिला. तसेच महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुठली ना कुठली कला असते ती प्रत्येकाने आपापल्या परीने दाखवली पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले. 

यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

 "स्पंदन" २०२६ हा कार्यक्रम खूप आनंद उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने