सौ.मालती शेणपडु इंदवे यांची शिरपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 


सौ.मालती शेणपडु इंदवे यांची शिरपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती.

  पोलीस मित्र अपराध नियंत्रण एव आंतरराष्ट्रीय मानवअधिकार संघटनाच्या शिरपूर तालुका अध्यक्षपदी मालती इंदवे यांची नियुक्ती झाली. महिला आर्थिक विकास महामंडळ बोराडी या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम केले  आहे. उमेद अभियाना अंतर्गत बचत गटाच्या ट्रेनर म्हणूनही काम केले आहे. त्या वीस वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. त्यांना हिरकणी समाजभूषण तसेच सावित्रीबाई फुले आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या समाज कल्याण मंत्री पदावरही त्या काम करत आहेत. आशा गटप्रवर्तक संघटना आयटक शिरपूर उपाध्यक्ष आहेत. स्मिता दोरीक, अरुणा सूर्यवंशी,आशा मराळे, वैशाली बुवा  यांच्याकडून संघटनेतर्फे मालती ताई इंदवे यांचे खूप खूप अभिनंदन.तसेंच भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिलिंग सदस्य आहेत. वसंत पाटील जिल्हा सचिव भा.क.प  यांच्या कडून खूप खूप अभिनंदन. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ऑ हिरालाल परदेशी, ऑ संतोष पाटील, अर्जुन कोळी, भरत सोनार यांच्याकडून मालची ताई यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने