असा कोण सगा नाही ज्याला भाजपने ठगले नाही!’ — राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर सडेतोड प्रहार

 



असा कोण सगा नाही ज्याला भाजपने ठगले नाही!’ — राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर सडेतोड प्रहार




बातमी:


मुंबई | दि. २२ ऑक्टोबर


सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्यांनी पुन्हा एकदा तीव्र निशाणा साधला आहे. साम मराठीच्या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं असून, यावर खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक भाषेत सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी केली आहे.


राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्षासंदर्भात एक जुनी म्हण प्रसिद्ध आहे — ‘अैसा कोई सगा नाही जिसको भाजपने ठगा नाही!’ मग अजित पवार कोणत्या झाडाच्या मुली?” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांनाही टोला लगावला.


याचबरोबर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हटलं की, “भाजपचेच आमदार सांगत आहेत की अधिकारी पैसे घेऊन दुबार मतदान करवतात. हा लोकशाहीचा अपमान असून, प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे.”


राऊतांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी विरोधकांच्या या सलग हल्ल्यामुळे सत्ता पक्षावर दबाव वाढत चालला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने