कर्मवीर व्यंकटराव रणधीर महाविद्यालयाची चेतना पाटील गुणवत्ता यादीत*




 *कर्मवीर व्यंकटराव रणधीर महाविद्यालयाची चेतना पाटील गुणवत्ता यादीत*

बोराडी : येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर व्यंकटराव रणधीर कला विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष रसायनशास्त्र विषयाची विद्यार्थीनी कु . चेतना अनिल पाटील ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एप्रिल मे 2025 मध्ये घेतलेल्या परीक्षेत तिला सर्वोत्कृष्ठ श्रेणी ९३.८३ सीजीपीए (ओ फ्लस) मिळवून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत  गुणानुक्रमे चौथी आली आहे . 

सराव परीक्षा वैयक्तिक मार्गदर्शन सुसज्ज प्रयोगशाळा या मुळे हे यश मिळाल्याचे चेतनाने म्हटले आहे .महाविद्यालयाचा व संस्थेचा लौकिक वाढविल्या बद्दल संस्थाध्यक्ष डॉ तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, विश्वस्थ राहुल रंधे, विश्वस्त रोहित रंधे विश्वस्त डॉ एस एन पटेल  एस. पी. डी. एम महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रो. एस. एस. राजपूत, प्राचार्य डॉ यु. एम. जाधव, प्रा. मुनेश पावरा, प्रा. यामिनी जाधव  कार्यालय प्रमुख गुणवंत पाटील प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू भगिनींनी अभिनंदन केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने