निमगुळ दोंडाईचाची सुकन्या मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात उच्च न्यायाधीश* दोडाईचा (अख्तर शाह)

 


*निमगुळ दोंडाईचाची सुकन्या मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात उच्च न्यायाधीश* 

दोडाईचा (अख्तर शाह) 

आपल्या दोंडाईचा शहराची सुकन्या दोंडाईचा नगरपालिका  शाळेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमती सुनंदा व स्व. निंबाजीराव पाटील  यांची सुकन्या सौ वैशाली निंबाजीराव पाटील जाधव यांची मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेल्या संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.

      वैशालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निमगुळ, जिल्हा परिषद शाळा तळोदा तसेच माध्यमिक शिक्षण के डी हायस्कूल तळोदा येथे झाले आहे तीने इयत्ता ६ वी चे शिक्षण घेत असतांनाच स्काँलरशिप परिक्षेत उत्तुंग यश मिळवल्यानंतर इयत्ता १० वी पावेतोचे शिक्षण केंद्रीय नवोदय विद्यालय अक्कलकुवा येथे झाले. त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण दोंडाईचा येथे तर पदवीचे शिक्षण पुण्याच्या सुप्रसिद्ध आय एल एस लाँ कॉलेज मधुन त्या LLB झाल्या. गेले १० वर्ष वैशाली संभाजीनगर खंडपीठात सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत.

वैशाली ने आय एल एस कॉलेज पुणे येथून पदवी प्राप्त केल्यानंतर  स्व.अँड मोहन गोरवाडकर यांची सहाय्यक म्हणून नाशिकला १ वर्ष काम केले. त्यानंतर स्व. अँड सी जे सावंत मुंबई यांची ज्युनिअर म्हणून काम केले. संभाजीनगर येथे अँड धनाजी जाधव यांच्याशी २००४ मध्ये लग्न झाल्यावर श्रीमती वैशाली ह्या गेली १० वर्ष संभाजी नगर उच्च न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहे. वैशाली चे पती डॉ धनाजीराव जाधव महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ संभाजीनगर येथे रजिस्टार आहेत तसेच त्यांचे मोठे बंधु प्राचार्य प्रशांत पाटील राजर्षी शाहू महाराज तंत्र निकेतन महाविद्यालय नाशिक येथे प्राचार्य असुन त्यांच्या मोठ्या भगीनी सौ विजयश्री साळुंखे वर्धा येथे प्राध्यापिका असुन दुसऱ्या भगीनी डॉ जयश्री मनोज निकम ह्या वैद्यकीय व्यवसाय शिरपुर येथे सेवा हाँस्पीटलच्या माध्यमातून करीत आहेत तर तीसरी भगीनी श्रीमती माधुरी पाटील ह्या संभाजीनगर येथे ड्रेस डिझायनर असुन सर्व भावंडे उच्च विद्या विभुषित असुन श्रीमती वैशाली निंबाजीराव पाटील जाधव ह्या 

उज्य न्यायालयात खान्देशातून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. त्याच्या नियुक्ती बद्दल निमगुळ दोंडाईचा त्यांचे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल महाराष्ट्र राज्याचे माजी विधि व कामगार राज्यमंत्री डॉ हेमंत नाना देशमुख भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुवीर बागल दोंडाईचा नगरपलीकेचे माजी सभापती तथा रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन अधिवक्ता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन अयाचीत दोंडाईचा बार कौन्सिलचे अध्यक्ष अँड जयवर्धन तायडे व सर्व सदस्य तसेच  निमगुळ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ स्वाती दिपक बागल व दोंडाईचा व निमगुळ परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे लवकरच त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने