दोंडाईचा अहिंसा इंटरनॅशनल स्कूलवर आर्थिक व मानसिक पिळवणुकीचे आरोप – पालकाचा आत्मदहनाचा इशारा!

 



दोंडाईचा अहिंसा इंटरनॅशनल स्कूलवर आर्थिक व मानसिक पिळवणुकीचे आरोप – पालकाचा आत्मदहनाचा इशारा!


दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) –


दोंडाईचा येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध शैक्षणिक वर्ष 2024-26 साठी बेकायदेशीररीत्या शालेय शुल्कवाढ, विद्यार्थ्यांवरील मानसिक छळ, आणि पालकांची आर्थिक लूट यांसारख्या गंभीर आरोपांची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, तक्रार दाखल होऊनही कारवाई न झाल्याने पालकांमध्ये संताप उसळला असून, संत पालकाने अखेर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार प्रमोद भगवानसिंग राजपूत (रा. पथारे, ता. शिंदखेडा) यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक, तहसीलदार आणि शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढील आरोप केले आहेत –


बेकायदेशीर शुल्कवाढ: सन 2008 मध्ये प्रवेशावेळी पालकांना दरवर्षी केवळ ₹1,000 वाढीचे आश्वासन दिले होते. मात्र, चालू वर्षी शाळेने शासनाच्या 15% कमाल वाढीच्या नियमानाकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ केली.


मानसिक छळ: शुल्क बाकी असल्यास विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवणे, शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होऊ न देणे, तसेच शाळेच्या बसची सुविधा बंद करण्याची धमकी देणे.


अनिवार्य साहित्य खरेदी: पालकांना शाळेकडूनच पुस्तके, वह्या, गणवेश, बूट, मोजे, पट्टा खरेदी करण्यास भाग पाडणे. यांची किंमत बाजारभावापेक्षा जास्त आणि गुणवत्ताही निकृष्ट असल्याचा आरोप.


तक्रारदारांनी निवेदनातून आरोप केला आहे  की,  लेखी तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. "प्रशासन आणि शासन मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. नाईलाजास्तव 15/08/2024 रोजी पंचायत समिती, शिंदखेडा येथे सकाळी 11 वाजता आत्मदहन करणार," असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

या प्रकरणी गटशिक्षण अधिकारी, शिंदखेडा यांच्याकडे तक्रार पोहोचली असली तरी अद्याप शाळेविरुद्ध कोणतीही तपास किंवा कारवाई सुरू झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात शिक्षण विभाग काय कारवाई करते आणि पालकांची कशाप्रकारे समजूत काढते याकडे आता पालक वर्गाचे लक्ष लागून आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने