प्रविण महाजन यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड दोंडाईचा (मूस्तूफा शाह)

 



प्रविण महाजन यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड 

दोंडाईचा (मूस्तूफा  शाह) 

 ( दि २९/८/२०२५) दोंडाईचा शहर भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रविण महाजन यांची धुळे जिल्हा ग्रामिण भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा ग्रामिण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

     प्रविण महाजन भारतीय जनता पक्षाचे अत्यंत जुने कार्यकर्ते असुन मा ना जयकुमार भाऊ रावल यांचे अत्यंत विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे दोंडाईचा शहराध्यक्ष पद एकुण ५ वेळा समर्थपणे सांभाळत जिल्हा चिटणीस जिल्हा सहकारी आघाडी प्रमुख इ अनेक संघटनात्मक पदे सांभाळून दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे ते माजी विरोधीपक्ष नेते आरोग्य तथा पाणीपुरवठा सभापती इ पदे त्यांनी भुषवली आहेत सध्या ते दोंडाईचा शहरातील सामाजिक संघटना रोटरी सिनियर्सचे अध्यक्षपदाची देखील धुरा वाहत आहे त्याच्या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार मा अमरीश भाई पटेल धुळे शहराचे आमदार मा अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार मा राम भदाणे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी नारायण भाऊसाहेब पाटील माजी उपाध्यक्ष विजय मराठे दोंडाईचा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील उपनगराध्यक्ष नबुभाई पिंजारी मनसेचे माजी नगरसेवक हितेंद्र महाले दोंडाईचा माजी बांधकाम सभापती निखिल जाधव शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे सरचिटणीस कृष्णा नगराळे भरतरी ठाकुर जितेंद्र गिरासे निखिल संजय तावडे तसेच सर्व माजी नगरसेवक भाजपा दोंडाईचा शहराचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने