🇮🇳 *गोखले एज्युकेशन सोसायटी मैदानावर 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* 🇮🇳



 🇮🇳 *गोखले एज्युकेशन सोसायटी मैदानावर 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* 🇮🇳


 *आज गोखले एज्युकेशन सोसायटीच्या* मैदानावर 79 वा स्वातंत्र्य दिन  उत्साहात संपन्न. 

*सदर कार्यक्रमाला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व  एस . एम .आर .के .महिला महाविद्यालयाच्या मा.प्राचार्या व  सर्वांच्या आदरणीय डॉ . सौ.दिप्ती देशपांडे  मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मा.मॅडम यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थितांना मार्गदर्शन केले.* 

   स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.पी.देशपांडे,नाशिक विभागाचे झोनल सेक्रेटरी डॉ.राम कुलकर्णी. संस्थेचे पदाधिकारी मा.डॉ.व्ही.एन.सुर्यवंशी , मा.प्रा.पी.एम.देशपांडे , मा.श्री.शैलेश गोसावी , मा.श्री.गिरीष नातु  व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य ,प्राध्यापक, प्राध्यापिका , शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळेतील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, महाविद्यालयांचे एन. सी. सी. कॅडेट, एन.एस.एस.चे विद्यार्थी व  विविध शाळा,महाविद्यालयांचे सर्व विद्यार्थी,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           *सर्व भारतवासीयांना गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा*.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने