🚨 दोंडाईचा डी.बी. पथकाची कारवाई – ५ चोरीच्या मोटारसायकलींसह संशयित चोरटा गजाआड! 🚨
दोंडाईचा / प्रतिनिधी – अख्तर शाह
दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी. पथक) अचूक माहिती व तात्काळ कारवाई करत एक मोठी चोरी उघडकीस आणली आहे. तब्बल पाच चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करत एक संशयित चोरटा अटक करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस यंत्रणेसाठी एक मोठे यश मानली जात आहे.
दोंडाईचा शहरातील राणीपुरा होळी चौक येथील अविनाश धनगर (वय २२) यांच्या ताब्यातील ५०,००० रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने २७ जून ते २८ जून २०२५ दरम्यान त्यांच्या घरासमोरील अंगणातून लंपास केली होती. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १६१/२०२५ नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासासाठी सहा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी डी.बी. पथकास निर्देश दिले होते. त्यानुसार ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोलीस गस्तीदरम्यान मांडळ चौफुली जवळ एक संशयास्पद युवक लाल रंगाच्या विना नंबरच्या पल्सर मोटारसायकलवर फिरताना आढळून आला.
तपासाअंती संबंधित इसमाचे नाव जुनेद इसाक शेख (वय २०, रा. म्हाळसा नगर, दोंडाईचा) असे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान त्याचे उत्तर उडवाउडवीचे वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तपास करताना समजले की, तो मोटारसायकल गुन्ह्यातील चोरीची आहे.
पोलीस अधिक तपासात त्याने एकूण ५ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली असून त्या सर्व सृष्टी गार्डन भागातील एका बंद घराजवळ झुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्या सर्व मोटारसायकली हस्तगत केल्या असून त्यांची अंदाजे एकूण किंमत १,५०,००० रुपये इतकी आहे.
हस्तगत करण्यात आलेल्या मोटारसायकलींचे तपशील:
१. बजाज पल्सर – चेचीस नं. MD2372BXOPCH51910
२. बजाज पल्सर – चेचीस नं. MD2B72BXOFCH51990
३. हिरो HF डिलक्स – चेचीस नं. MBLHA11AED9M02450
४. हिरो HF डिलक्स – चेचीस नं. MBLHAR05XH9430075
५. बजाज डिस्कव्हर – चेचीस नं. MDRDSPAZZTWG40782
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकात पोसई नकुल कुमावत,पोहेकॉ. रविंद्र गिरासे,पोकॉ. हिरालाल सूर्यवंशी,पोकॉ. प्रविण निकुंबे,पोकॉ. सौरभ बागुल,होमगार्ड अमीन शहा यांच्या पथकाने केली.