"कृषी सहाय्यकांच्या मागण्यांसाठी संघर्ष तीव्र: शिरपूर शाखा धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग"
शिरपूर (दि. ७ मे २०२५):
राज्यातील कृषी सहाय्यकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. आंदोलना अंतर्गत विविध टप्प्यांत कृती करण्यात येत असून, शिरपूर तालुका कृषी सहाय्यक संघटना देखील या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाली आहे.
आंदोलनाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:
५ मे: काळी फित लावून कामकाज
६ मे: सर्व शासकीय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडणे
७ मे: सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन
८ मे: एक दिवसाचे सामूहिक रजेवर जाणे
९ मे: सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार
१५ मे: सर्व योजनांचे कामबंद आंदोलन
शिरपूर शाखेच्या वतीने धरणे आंदोलनात सहभागी झालेल्यांमध्ये अध्यक्ष मंदार भदाणे, राज्य प्रतिनिधी विशाल पावरा, तसेच राजेंद्र चौधरी, अविनाश पाटील, महेंद्र पाटील, श्रीमती वाघ मॅडम, दिलबरसिंग गिरासे, योगेश चौधरी, भाग्यश्री रामोळे मॅडम, गुलाब शिरसाठ, योगेश पवार, भूषण चौधरी, राहुल साळुंखे, अतुल बाविस्कर, राकेश चव्हाण, सुनील सोनवणे, जितेंद्र गिरासे, धनंजय महाले, अरबी कोकणी, मुकेश पावरा, संजय पाटील यांचा समावेश आहे.
संघटनेने स्पष्ट केले आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. शासनाने त्वरित निर्णय घेऊन आंदोलनाचा शांततापूर्ण मार्ग स्वीकारावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
