शिरपूर शहरात संत भीमा भोई जयंती उत्सहात संपन्न*



 *शिरपूर शहरात संत भीमा भोई जयंती उत्सहात संपन्न* 


शिरपूर /प्रतिनिधी - शिरपूर शहरात भोईराज युवा प्रतिष्ठान तर्फे मोठ्या उत्सहात संत शिरोमणी भीमा भोई यांची जयंती बालाजी मंदिर, जुनी भोई गल्ली या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री आ अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते संत भीमा भोई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच ह.भ. प रविकिरण महाराज यांच्या मधून वाणीतून कीर्तनचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष तरुण मंडळी उपस्थित होते.  यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शिरपूर एज्यु सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, जि प उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे अरुण धोबी,डॉ मनोज महाजन, शामकांत ईशी, वासुदेव देवरे, भालेराव माळी, डॉ सुनील वाडीले, डॉ कैलास मोरे, भुरा राजपूत,  कन्हैयाभाऊ चौधरी विनोद सोनार, विनायक कोळी, सुरेश अहिरे, पिंटू माळी, मामा पाटील, अमोल पाटील, इरफान मिरझा,दिपक बरी, राज सिसोदिया, मोहन कोळी आदी. 

   कार्यक्रम यशस्वीसाठी भोईराज युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी  संस्थापक अध्यक्ष दिपक भोई, उत्सव समिती चे अध्यक्ष गणेश भोई, हरीश भोई, पत्रकार अनिल भोई,  गणेश तामखाने, मयूर सोनवणे, आकाश सोनवणे, विक्की भोई, बंटी भोई, भैय्या सोनवणे, गोलु भोई, मेहुल भोई आदींनी कार्यक्रमसाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केल तर आभार अनिल भोई यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने