*हिंदूसूर्य महाराणा प्रताप म्हणजे स्वातंत्र्य व आत्मसन्मानासाठी न झुकणारा हिमालय - बबनराव चौधरी*
शिरपुर : हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची तिथीनुसार (दि. २९ मे) रोजी ४८५ वी जयंती निमित्त शिरपुर तालुक्यातील अहिल्यापुर येथे धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. प्रचंड मुघल सैन्य, अतुलनीय दारुगोळा, युद्धाच्या नवीन पद्धतींचे ज्ञान असलेले सल्लागार, हेरांची एक लांबलचक यादी व फसवणूक करूनही महाराणा प्रताप यांची मान खाली घालण्यात अकबर अपयशी ठरला. महाराणा प्रताप यांनी कसेही करून अकबराची अधीनता स्वीकारून 'दीन-ए-इलाही' धर्म स्वीकारावा अशी मुघलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी महाराणा प्रतापांना अनेक मोहक संदेशही पाठवले, परंतु महाराणा प्रताप आपल्या निर्धारावर ठाम राहिले. महाराणा प्रताप "राजपूतांचा अभिमान, हिन्दुत्वाचे गौरव सूर्य" अशा संकटात देखील त्याग, तप व धर्म या करिता खंबीर राहिले, असे गौरवोद्गार धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी शिरपुर तालुक्यातील अहिल्यापुर येथे प्रतिमा पुजन प्रसंगी व्यक्त केले. अहिल्यापुर येथे महाराणा प्रताप जयंती निमित्त माजी सरपंच संग्रामसिंग राजपुत यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपुर भाजपा मा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, थाळनेर भाजपा मंडळ अध्यक्ष विरुपाल राजपुत, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपक धनगर, भाजपा भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे आदि पदाधिकारींनी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन केले. तेजस्वी युगपुरुष म्हणून भारतीय इतिहासात अजरामर झालेले हिंदूसूर्य महाराणा प्रताप हे आपले असाधारण साहस, असीम पराक्रम, देशाभिमान, अपूर्व त्याग, आत्मसन्मान इत्यादी गुणांनी अलंकृत होते. त्यामुळे या देशाची संस्कृती जोवर टिकून आहे तोपर्यंत महाराणा प्रताप यांचे नाव देशाभिमान व आत्मसन्मानासाठी अडीग राहिलेला हिमालय म्हणूनच परिचित राहील. महाराणा प्रताप यांचे नाव संपूर्ण देशाला स्वातंत्र्य व स्वाभिमानाचा संदेश देत राहील असेही प्रतिपादन या वेळी बबनराव चौधरी यांनी केले. यावेळी हिंदूसूर्य महाराणा प्रताप की जय हा जयघोष निनादत होता. याप्रसंगी अंबालाल राजपुत, परमसिंग राजपुत, सुरेश पाटील, अमृत राजपुत, देवनाथ पाटील, भिकेसिंग राजपुत, रजेसिंग राजपुत, भगवान राजपुत, संदीप राजपुत, ज्ञानेश्वर राजपुत, चंद्रकांत तंवर, राजेंद्र मिस्तरी, गुलाबसिंग राजपुत, दरबार राजपुत, राकेश राजपुत, रविंद्र मोरे, जगदिश राजपुत, जयपाल राजपुत, मयुर राजपुत, एकनाथ पवार,युवराज राजपुत, काशिनाथ पाटील, यशवंत पाटील, महेंद्र राजपुत आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
