ग्राहक वर्तणूक पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

 


ग्राहक वर्तणूक पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन 


शिरपूर, किसान विद्या प्रसारक संस्था संचलित एसपीडीएम कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील उपप्राचार्य व वाणिज्य विषयाचे प्राध्यापक डॉ. दिनेश भक्कड यांचे ग्राहक वर्तणूक हे ३८ वे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल डोंगरे, सहलेखक प्रा. डॉ. रवी केसर, अभ्यासमंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन जाधव, विद्या शाखा सदस्य प्रा.डॉ.श्याम साळुंखे, प्रशांत पब्लिकेशनचे संस्थापक रंगराव पाटील आदी उपस्थित होते. सदर पुस्तकात फैजपूर महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. रवी केसर व एसपीडीएम महाविद्यालयाचे प्रा. उमेशचंद्र पाटील यांनी सहलेखन केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित ग्राहक वर्तणूक हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे असे मत यावेळी माननीय कुलगुरू प्रा.डॉ.व्हि.एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केले. या पुस्तक प्रकाशन प्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, विश्वस्त मा. प्राचार्य डॉ एस. एन. पटेल, अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, उपप्राचार्य डॉ.ए.एम.देशमुख यांनी डॉ. दिनेश भक्कड व प्रा. उमेशचंद्र पाटील यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने