विधी महाविद्यालय, नंदुरबारची विद्यार्थीनी कु. दिपाली पाडवी हिची एमपीएससी परिक्षेत भरारी...*

 



*विधी महाविद्यालय, नंदुरबारची विद्यार्थीनी  कु. दिपाली पाडवी हिची एमपीएससी परिक्षेत भरारी...* 


*कु.दिपाली पाडवी अनु.जमाती प्रवर्गात मुलींमध्ये राज्यात प्रथम...*


*बहुजन कल्याण-राजपत्रीत अधिकारी म्हणून निवड...*



*नंदुरबार-* नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंगभैया रघुवंशी विधी महाविद्यालय, नंदुरबार येथील एलएलबी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. दिपाली अर्जुन पाडवी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बहुजन कल्याण अधिकारी तथा 

राजपत्रित अधिकारीपदी निवड झाली आहे. 


दिपाली पाडवी ही राज्यात अनु. जमाती प्रवर्गात मुलींमध्ये प्रथम

क्रमांकाने उत्तीर्ण झाली. नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंग भैया रघुवंशी विधी महाविद्यालय, नंदुरबार येथे एलएलबी तृतीय वर्षात शिकत आहे. दिपाली पाडवी यांच्या हया यशाबद्दल भारताचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल मा.ॲड.राजेंद्र रघुवंशी, संस्थेचे चेअरमन मा. आ. श्री.चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मा.श्री मनोजभैय्या रघुवंशी,  तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एन डी चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने