शिरपूरचे ग्रामदैवत खंडेराव बाबा महाराज यांचा यात्रा उत्सवास प्रारंभ

 



शिरपूरचे ग्रामदैवत खंडेराव बाबा महाराज यांचा यात्रा उत्सवास प्रारंभ


शिरपूर - 


बुधवार 12 फेब्रुवारी 2025 सकाळी साडे 9 वाजेच्या सुमारास शिरपूर शहराचे जुने व जागृत देवस्थान म्हणुन अरुणावती नदीकाठावर 273 वर्षांची परंपरा आणि प्रसिद्द असलेले महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराजांचा माघ शु।। पोर्णिमेपासून यात्रोत्सवाला मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून सदानंदाचा येळकोट... खंडेराव बाबा की जय'च्या गजरात उद्घाटन करण्यात आले.

      यात्रोत्सव उद्घाटनप्रसंगी झालेल्या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.काशीराम पावरा होते आणि माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,उपविभागीय अधिकारी डॉ.शरद मंडलिक,डीवायएसपी सुनील गोसावी,निरीक्षक के. के. पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे,माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील,विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मंदिर ट्रस्ट सदस्य आदी मान्यवर उपस्थितीत होते.श्री खंडेराव महाराज विकास संस्थानच्या सेवकांसह यात्रेच्या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार काशिराम पावरा,भूपेशभाई पटेल, बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले. संजय आसापुरे यांनी प्रास्ताविक, तर यशवंत निकवाडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड यांनी आभार मानले. 

      सदर यात्रोत्सव आजपासून 15 दिवस त्या पार्श्वभूमीवर खंडेराव महाराज मंदिर संस्थानकडून यात्रोत्सवासाठी संपुर्ण तयारी व नियोजन करण्यात आले आहे.पहिल्याच दिवशी सकाळ पासून हजारो भाविकांनी ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने