आश्रम शाळेत दहशत वाजवणाऱ्या 17 आरोपींना थाळनेर पोलिसांकडून अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील फाळनेर पोलीस स्टेशनच्या कारवाईत महादेव आदिवासी आश्रम शाळा, अनेर डॅम ता. शिरपुर येथे हमला करुन विदयाथी व शिक्षकांना मारहाण करुन दहशत माजवणाऱ्या १७ आरोपीतांना अटक केले आहेत.
दि. २८/०१/२०२५ रोजी तक्ररदार श्री. कुंदन लक्ष्मण पावरा, वय ३५ वर्षे, व्यवसाय- नोकरी, रा. लाकडया हनुमान ता. शिरपुर जि. धुळे यांनी थाळनेर पोलीस स्टेशन येथे तक्रारदिली की, दिनांक २६/०१/२०२५ रोजी आदिवासी एकात्मीक प्रकल्प धुळे अंतर्गत अनुदानीत महादेव आदीवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा, अनेरडैम ता. शिरपुर जि. धुळे येथे मुलांचे किरकोळ भांडणाचे कारणावरुन महादेव दोंदवाडा गावातील २३ आरोपीतांनो शाळेत हातात काठया, दगड घेऊन आश्रम शाळेत हमला करुन शाळेतील विदयार्थी, शाळेचे संस्थाचालक, सचिव, अधिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, पाहरेकरी तसेच गावातील स्थानिक पालक यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले म्हणुन त्यांचे विरुध्द थाळनेर पोस्टे गुरनं. ११/२०२५ भा.न्या.सं. कलम १०९, १३२, १२१(१), ११५(२). १८९(२), १८९ (४),१९१(२),१९१ (३),१९०,३३३, १२६(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपी हे गुन्हा करुन फरार झाले होते. सदर आरोपीतांनी केलेल्या कृत्या मुळे आश्रम शाळेतील शिक्षक व विदयार्थी यांचे मनात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीतांचे भितीमुळे सदर आश्रम शाळेतील ७०९ मुले व मुली (विदयार्थी) हे घरी निघुन गेले आहेत.
यातील आरोपीतांनी शिक्षणाचे मंदीरावर हमला केले मुळे तसेच आरोपीतांनी केलेल्या कृत्या मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीतांचा शोध घेणेकामी वेगवेगळे पथक तयार करुन आरोपीतांचा गुन्हा दाखल झाले पासुन शोध घेत असतांना गुप्त बातमीव्दारा व्दारे मिळालेच्या माहितीचे आधारे पोलीस पथकासह महादेव गावा जवळील जंगलात व पहाडी भागात आरोपीतांचा शोध घेतला असता तेथे आम्हास गुन्हयातील १) ओमाशा जामसिंग पावरा २) कायसिंग ऊर्फ पिंट्या भरत पावरा ३) दारासिंग रामसिंग पावरा ४) रंजित डिगा पावरा ५) आनंद डिगा पावरा ६) सेवसिंग रुपा पावरा ७) दिलीप रुपा पावरा ८) राजु लक्ष्मण पावरा ९) संजय लक्ष्मण पावरा १०) सुभाष लक्ष्मण पावरा ११) लतिफ वनसिंग पावरा १२) दित्या खजान पावरा १३) सिताराम नाना पावरा १४) सत्तरसिंग रामसिंग पावरा १५) वसंत शंकर पावरा १६) सागर दारासिंग पावरा १७) मिथुन लक्ष्मण पावरा हे मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीतांना अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे परिसरातून कौतुक होत असून यामुळे परिसरात पसरलेली भीती कमी झाली आहे. शिवाजी या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांनी कोणतीही भीती बाळगू नये असे देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा, पोलीस अधीक्षक सो श्री, श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक सो श्री. किशोर काळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो. स्टे प्रभारी श्री. शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोहेको संजय धनगर, पोना/ भूषण रामोळे, पोकों/ उमाकांत वाघ, पोकों/ किरण सोनवणे, पोकों/ धनराज मालचे, पोकॉ/मुकेश पावरा, पोकों/ भाऊसाहेब मालचे, मपोकॉ/ ललीता पाटील, चापोकों/दिलीप मोरे अशांनी मिळून केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई समाधान भाटेवाल हे करीत आहेत.
