*दोंडाईचा व मोराणे येथील बौध्दिक दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश**
दोडाईचा अख्तर शाह
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई दिव्यांग आयुक्तालय पुणे अतंर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जि.प. धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने कै. बापुसो एन. झेड. मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह शिरपुर यांच्या सौजन्याने आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे ता. शिरपुर जि. धुळे येथे दि.१८/०१/२०२५ रोजी बौध्दिक दिव्यांगाच्या विविध क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये वयोगटानुसार मानसिक दिव्यांग या प्रवर्गाच्या ५०,१००,२०० मीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी, स्पॉट जंम्प, सॉफ्ट बॉल थ्रो इत्यादी क्रिडा प्रकारानुसार स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये धुळे जिल्हयातील बौध्दिक दिव्यांग शाळांनी सहभाग घेतला होता त्यात सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संस्था संचलित स्व. खंडु पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे व स्व. तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे उपनगर धुळे या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरपुर येथे जिल्हा स्तरीय बौध्दिक दिव्यांग क्रिडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात बौध्दिक दिव्यांग विद्यालय दोंडाईचा येथील दोन विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमपरिश्रम घेतले
बक्षीस संपादन केले तसेच तीन विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस संपादन केले व बौध्दिक दिव्यांग विद्यालय मोराणे उपनगर धुळे येथील तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस संपादन केले व तीन विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांकाचे बक्षीस संपादन केले विजयी विद्यार्थ्यांना मा.श्री. दादासो काशिरामजी पावरा (आमदार विधानसभा शिरपुर क्षेत्र) व मा.श्री. नितीन खंडेराय साहेब (जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. धुळे) व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी मा. संस्था अध्यक्ष साहेबांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी परिश्रम
