*रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ*
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती
टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे, धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे, जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ आणि रोटरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४५ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राष्पती ऐ.पी .कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरु करण्यात आले
यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार. शाळेचे प्रिन्सिपल यांनी केले
यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह व पंचायत समिती शिंदखेड्याचे गटविकास अधिकारी श्री आर. डी. वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. सी.के. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी. एस. सोनवणे, धुळे जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री पी. झेड. कुवर, पर्यवेक्षक श्री सुधाकर बागुल, शिंदखेडा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री आर. ए. चित्ते, श्रीमती शारदाबेन शाह, स्कूलचे संचालक श्री रमेश पारख,श्री पी.सी.शिंदे, डॉ. राजेश टोणगांवकर, आर.डी.एम.पी कॉलेजचे प्राचार्य श्री संजय चंदने रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री पंकज कवाड, रोटरी क्लब दोंडाईचाचे अध्यक्ष पंकज कवाड, रोटरी सिनिअर्सचे अध्यक्ष श्री सौरव अग्रवाल, रो. गुलामरसूल शेख, रो.अनिस शाह , परीक्षक म्हणून लाभलेले श्री पी. जी कागणे, सौ. चेतना पाटील, श्री अमोल परदेशी,श्री सुहास भावसार,समन्वयक प्रशांत जाधव, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुनिल बिरारीस, जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
दि.७ ते ९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या जिल्हास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट, प्रयोगशाळा सहाय्यक, अध्यापक साहित्य निर्मिती अशा विविध गटातील 54 अशी वैविध्यपूर्ण उपकरणे मांडण्यात आली असून या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी.
रोटरी स्कूलमध्ये भविष्यकालीन पृथ्वीचे मॉडेल, रोबोट, कला, वैज्ञानिकांची माहिती, विज्ञान विषयावर आधारित पुस्तके , ई-लायब्ररी अशी दालने मांडण्यात आली असून ती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी ग्रामीण भागात उत्तम, गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट निकालाची परंपरा राखणारी शाळा असून सन 2025-26 पासून ज्युनिअर सीबीएसई सायन्स कॉलेजला प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले.
श्री पी. झेड. कुवर यांनी जागतिक प्रसिद्धीचे संशोधक स्व. डॉ.नानासाहेब रवींद्रनाथ टोणगांवकर हे रोटरी स्कूलचे आधारस्तंभ होते. ही सगळ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रदर्शनात आदिवासी व दिव्यांग विद्यार्थ्यांनाही संधी दिली असल्याचे सांगितले.
डॉ. सी. के. पाटील यांनी विज्ञानामध्ये अनुकरण महत्त्वाचे नसून नाविन्य महत्त्वाचे असते. रोटरी स्कूलने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण पृथ्वीच्या मॉडेलवरून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कास धरावी. असे मनोगत व्यक्त केले.
श्री आर.डी. वाघ म्हणाले की, विदयार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी. कोरोनासारख्या महाभयंकर काळातही विज्ञानाचा आधार मिळाला होता. म्हणून विद्यार्थ्यांनी विज्ञान गावागावात पोहचवावे.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह म्हणाले की,
विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणांचे कल्पनाशक्तीच्या जोरावर व संशोधकवृत्तीने उत्कृष्ट सादरीकरण करून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल गाठावी.
या प्रदर्शनात गोपाल ढोले,जाफर मिर्झा,शितल पाटील,सुचेता पाटील, मयुरी भदाणे, दिपमाला ठाकूर, विक्की बाटुंगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन सौ. ललिता गिरासे, कु. ऐश्वर्या पाटील व कु. दिप्ती शिंगाणे यांनी केले
