शिरपूर कागदी कपांवर बंदी आणण्यासाठी मनसे चे निवेदन
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर व तालुक्यात चहा विक्रेत्यांकडून सर्रासपणे कागदी कपांचा वापर होत आहे त्यावर तात्काळ बंदी आणून कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील व शहरातील अनेक सरकारी कार्यालयांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने मा. श्री. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय,शिरपूर जि.धुळे
मा.मुख्याधिकारी सोा. शिरपूर वरवाडे नगरपालिका शिरपूर मा. पोलीस निरीक्षक सौ. शिरपूर पोलीस स्टेशन, शिरपूर यांना दिले निवेदन आहे.
शिरपूर शहरासह तालुक्यात कागदी चहाचे कप यांचे सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर आपल्या कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई होत नसून त्यांच्यावर त्वरीत कारवाई करुन चहाचे कागदी कप जप्त व्हावे.. चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्याबाबत संदर्भिय पत्रात नमुद केले आहे. पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून पदार्थाचे सेवन केले असता त्यामुळे लवकरच कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. चहा शौकिनांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामांक केमिकल शिवाय कप बनत नाही. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण दिले जात असल्याचे सांगितले गेले असूनही शिरपूर शहर व तालुक्यात चहाच्या दुकानातुन सर्रासपणे कागदी ग्लास वापरले जात असून त्यांच्यावर त्वरीत कारवाई करून बंदी असलेल्या ग्लास बाबत जागरुकता करण्यात यावी. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनसे तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनसे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, मनसे तालुका उपाध्यक्ष सुनील जाधव, शहर उपाध्यक्ष बाबू मुस्ता, मयूर कोळी शकील तेली अदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
