आरोपींना फाशी द्या, तासिलदारांमार्फत गृहमंत्र्यांना शिरपूर फर्स्ट व ट्रायबल फोरमचे निवेदन..
नंदूरबार जिल्ह्यातील मोलानी येथे दीपाली चित्ते ह्या आदिवासी बहिणींची एका समाजकंटकाकडून चाकूने वार करून हत्या करण्यात आली, अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असे निवेदन शिरपूर फर्स्ट व ट्रायबल फोरमच्या वतीने तसीलदारांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना दिले आहे.
यावेळी ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा, शिरपूर फर्स्ट चे समन्वयक हंसराज चौधरी, साहेबराव सोळंकी व समाजातील कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते.
