*महाराणा प्रताप संस्था शिरपूर तर्फे 'संस्कार शिबीर'*





*महाराणा प्रताप संस्था शिरपूर तर्फे 'संस्कार शिबीर'*

शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील 'महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था' शिरपूर तर्फे राजपूत समाजातील तरुण मुला-मुलींसाठी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज आपण प्रत्येक समाजात पाहतो की तरुण मुलं अल्प वयातच व्यसनाधीन होत चालले आहेत. मुला-मुलींचे घटस्फोटाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. याला आळा बसावा, तरुणांना योग्य संस्कार व्हावेत, ते पुढे समाजात मोठे व्हावेत यासाठी 'महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था' शिरपूर तर्फे समाजातील युवक-युवतींसाठी संस्कार शिबीराचे आयोजन करीत आहेत.




नाताळ निमित्त सर्वाना सुटी असते त्यामुळे दि 25/12/2024 रोजी सकाळी 9.30 वाजे पासून स्व इंद्रसिंहजी राजपूत मेमोरियल हॉल (राजपूत भवन), शिरपूर येथे क्षत्रिय युवा संस्कार शिबीर आयोजित केले आहे. 

या कार्यक्रमांस श्री रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजर्षी कुंवर श्री राजेंद्रसिंहजी नरुका, मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलनाचे मुख्य पक्षकार व सुप्रसिद्ध कथावाचक परमपूज्य कौशल किशोर ठाकूर जी महाराज मार्गदर्शन करणार आहेत. 

संस्कार शिबिराचे अध्यक्ष उद्योगपती श्री भूपेशभाई पटेल व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री काशिरामदादा पावरा, अस्तिव फॉउंडेशनच्या चेअरमन कु द्वेतादीदी भूपेशभाई पटेल, सुरत येथील साई धारा ग्रुपचे युवा उद्योजक रविंद्रसिंग राजपूत (रविशेठ) उपस्थित राहणार आहेत.

शिरपूर तालुक्यातील समाज बांधवांनी व युवक-युवतींनी या संस्कार शिबीरांस जास्तीस जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 'महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था' शिरपूर चे अध्यक्ष श्री संग्रामसिंग राजपूत, उपाध्यक्ष श्री योगेंद्रसिंग सिसोदिया, व्यवस्थापक श्री प्रविणसिंग राजपूत व संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने