अखेर आमदार जयकुमार रावल यांना मंत्री पदाची लॉटरी
शिरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुका झाल्यानंतर प्रतीक्षा होती ती नवीन सरकारच्या स्थापनेची आणि संभावित मंत्री पदांची. मागील काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदासाठी लॉबिग सुरू केले होते. तीनही पक्षांच्या आमदारांनी मंत्री पदासाठी आपली फिल्डिंग लावली होती.
त्यात भारतीय जनता पार्टीचे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आमदार जयकुमार रावल यांच्या विजय सु निश्चित झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची वर्णी लागणार हे निश्चित मानले जात होते. आमदार रावल यांची पाच टर्म आमदारकी झाली असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी 90 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेत दणदणीत विजय प्राप्त केला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप बेडसे आणि काँग्रेसच्या श्याम सनेर यांच्या त्यांनी पराभव केला होता.
नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात खानदेशाला मंत्री पदाच्या लाभ मिळेल हे आधीच मानले जात होते. त्यात आता अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी शिंदखेडा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार रावल यांना मंत्रिपदासाठी आमंत्रित केले गेल्याची बातमी समोर आली आहे.
हे वृत्त समोर येतात शिंदखेडा तालुक्यात आणि धुळे जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा केला जात असून आत्तापासूनच आमदार जयकुमार रावल यांच्यावर अभिनंदन आजच्या वर्षाव होत आहे.
याआधी त्यांनी रोजगार हमी योजनेचे मंत्रीपद भूषवले आहे आता नवीन सरकार मध्ये त्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी मिळते हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान भाजप सरकारने खानदेशाला मंत्रिपदाच्या मान दिला आणि आमदार जयकुमार रावल यांची निवड केली म्हणून महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांकडून आभार व्यक्त केले जात आहे.
