चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार दोन हजार रुपयाच्या लाच प्रकरणात अटकेत
धुळे प्रतिनिधी - धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने विभागाने कारवाई केले असता चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार त्यांच्या हस्तक मार्फत दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी जयेश रामराव पवार, पोलीस हवालदार, ब.नं. २०५, चाळीसगांव ग्रामीण पो. स्टे. यांनी तक्रारदार यांचेकडुन तडजोडीअंती ४,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता २,०००/- रुपये खाजगी इसम सुनिल श्रावण पवार यांचे हस्ते स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार हे मौजे तरवाडे, ता. चाळीसगांव येथील रहिवासी असुन त्यांचे गावातील इसमाशी वादविवाद झाल्याने त्या इसमाने तकार दिल्याने तक्रारदार यांचेविरुध्द चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे. येथे दि. ०५.०९.२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वाघळी बिटचे पोलीस हवालदार जयेश रामराव पवार यांनी तक्रारदार यांना पोलीस स्टेशन येथे दि. ०८.११.२०२४ रोजी बोलावुन त्यांचेवर तहसिलदार चाळीसगांव यांचेसमक्ष प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना पोलीस स्टेशन येथे बसवुन ठेवले होते. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांना घरी जावु देणेबाबत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांचेविरुध्द दाखल झालेल्या गुन्हयात व प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच त्यामध्ये तक्रारदार यांना त्रास न होवु देण्यासाठी त्यांच्याकडे ४,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी आज दि. १२.११.२०२४ रोजी ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयात समक्ष येवुन तकार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. १२.११.२०२४ रोजी चाळीसगांव येथे जावुन पडताळणी केली असता पोलीस हवालदार जयेश पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तडजोडीअंती ४,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता २,०००/- रुपये त्यांनी खाजगी इसम सुनिल श्रावण पवार, रा. न्हावे, ता. चाळीसगांव जि. जळगांव यांचे हस्ते त्यांचे वाघळी बिटचे कक्षात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचेविरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

