हमी भावापेक्षा कमी भावात कापसाची खरेदी, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापारावर कारवाई होईल का ?
शहादा प्रतिनिधी - शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणण्यात सुरुवात केली आहे. यात शासनाकडून कापसासाठी 6880 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. यात जास्तीत जास्त दर हा सात हजार चारशे रुपये निर्धारित करण्यात आला आहे. तर सरासरी भाव हा 7275 रुपये ठेवण्यात आला आहे. आज जवळपास 55 वाहने कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले होते. मात्र शहादा तालुक्यातील तीखोरा येथील शेतकऱ्याला या कापसाच्या मालाच्या भाव हा 6425 रुपये देण्यात आला. यावरून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून व्यापारा शी हुज्जत घातली. या प्रकारामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कमीत कमी 6880 रुपयांच्या दर निश्चित केला असताना व्यापाऱ्याने 6425 रुपयांचा दर कसा लावला यावरून वाद निर्माण झाला. आणि ह्या सर्व प्रकार वरून शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाचे नियम पाळले जात नसून व्यापारी मनमानी करत असल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतील या व्यापाऱ्यावर बाजार समिती कारवाई करेल का असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मागील वर्षी देखील याच व्यापाऱ्याच्या व्यवहारावरून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा याच व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोप होत आहे.
