मूड महाराष्ट्राचा
मूड शिरपूर विधानसभेचा ..
पहा निर्भीड विचार वर लोकांनी व्यक्त केलेल्या मतांचा सर्वे
पहा काय आहे मूड, महाराष्ट्राचा ,मूड शिरपूर विधानसभेचा..
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या मतदानानंतर आता सगळ्यांचे लक्ष आहे ते निकालावर.. कोणाचे असेल महाराष्ट्रात येणारे सरकार, कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोण असेल आमदार ? यावर विविध अंदाज व्यक्त होत असून विविध सर्वे देखील समोर येत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आणि शिरपूर विधानसभा निवडणुकीसाठी निर्भीड विचार या न्यूज चॅनलवर देखील महाराष्ट्राचा मूड, शिरपूर मतदार संघात मतदारांच्या मूळ, आणि शिरपूर विधानसभेच्या विजयाच्या दावेदार कोण, कोणाचे असेल महाराष्ट्रात सरकार, जनतेच्या आवडता मुख्यमंत्री कोण, शिरपूर विधानसभेच्या निवडणुकीच्या मुद्दा काय , कोण असेल जनतेच्या मनातील आमदार, मनोज जरांगे पाटील भाजपासाठी मोठे आव्हान ठरतील का?
असे अनेक प्रश्न जनतेला पोल च्या माध्यमातून विचारण्यात आले होते आणि त्यावर आपले मत व्यक्त करण्यासाठी पोल टाकण्यात आलेला होता. त्यावर जनतेने आपले मत व्यक्त करून जनतेच्या मूळ काय हे या पोल वर क्लिक करून दाखवले आहे. लोकांनी केलेल्या मतदारानुसार हा पोल आपणास आम्ही दाखवत आहोत.
तर मग पाहूया आपण मूड महाराष्ट्राचा आणि मुड शिरपूर विधानसभेचा...
2024 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाचे सरकार असेल ?
महाविकास आघाडी..... ,36%
तिसरी आघाडी.... 4%
असे मत व्यक्त केले असून या सर्व्हे मध्ये 1800लोकांनी मत यक्त केले आहे. यात सर्वाधिक पसंती महाविकास आघाडीला 60 % देण्यात आली आहे.
कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या वर जनतेला प्रश्न विचारण्यात आला होता त्यात
उद्धव ठाकरे ...56%
देवेंद्र फडणवीस ... 12%
एकनाथ शिंदे ... 16%
यासाठी 1100 लोकांनी मत व्यक्त केले त्यात सर्वाधिक पसंती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 56% यांना दिसून येत आहे.
ठाकरेंच्या महविकास आघाडीपेक्षा शिंदेंचे महायुती सरकार अधिक भ्रष्ट आहे का ? यावर लोकांनी प्रतिक्रिया दिले आहे की
होय ...75%
नाही...25%
यात 494 लोकांनी सहभाग घेतला त्यांच्या मतानुसार महायुती सरकार अधिक भ्रष्ट आहे.
विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील भाजपा समोर मोठे आव्हान उभे करून त्यांना पराभूत करतील का ?
नाही ... 34%
यात 468 लोकांनी सहभाग घेतला त्यांच्या मतानुसार जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल.असे 66% लोकांना वाटते.
शिरपूर विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दावेदार कोण ?
डॉक्टर जितेंद्र ठाकूर ..65%
यात 970 लोकांनी सहभाग घेतला त्यांच्या मतानुसार विजयाच्या दावेदार आहेत डॉक्टर जितेंद्र ठाकूर.
शिरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारां यांच्यात विजयाच्या दावेदार कोण?
Dr.thakur...51%
Pawra Budha ....6%
Bsp...3%
यात 1800 लोकांनी मतदान केले त्यात डॉक्टर यांना 51 टक्के मतांची पसंती आहे.
विधानसभा निवडणुकीत शिरपूरच्या प्रमुख मुद्दा काय ?
टोल...6%
बेरोजगारी ...,18%
महागडे शिक्षण ...12%
यात 894 लोकांनी सहभाग घेतला त्यात तालुक्यातील महत्त्वाच्या मुद्दा म्हणून शेतकरी सहकारी साखर कारखान्याला अधिक मते मिळाली आहेत.
त्यामुळे शिरपूर तालुक्यात घेतलेल्या या पोल नुसार नागरिकांची पसंती ही महाविकास आघाडी असून, शिरपूर मतदारसंघात विजयाच्या दावेदार म्हणून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याकडे लोकांचा कल दिसत आहे.
ही सर्व आकडेवारी आम्ही आमच्या चॅनलवर दाखवण्यात आलेल्या पोलला अनुसरून केले आहे.
याव्यतिरिक्त या तालुक्यात प्रत्येक उमेदवाराच्या आपला विजयाचा दावा आहे. प्रत्येकाला मानणारा वेगळा वर्ग आहे, प्रत्येकाची विचारधारा ही देखील वेगळी असून , तालुक्यातील प्रत्येक उमेदवाराला आपणच विजयी होणार असा विश्वास देखील आहे.
त्यामुळे आमच्या सर्वे मध्ये ठराविक लोकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार आम्ही हा सर्वे केला आहे. प्रत्यक्षात मतपेटीत बंद झालेले लोकांचे मत हाच अंतिम निकाल असेल. आणि तो सर्व मान्य असेल.







