शिरपूर विधानसभा मतदार संघात 13 नोव्हेंबरला होणार गृहमतदान;* *162 वृद्ध, दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क*





*शिरपूर विधानसभा मतदार संघात 13 नोव्हेंबरला होणार गृहमतदान;*

*162 वृद्ध, दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क*

धुळे, (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार 09-शिरपूर विधानसभा मतदार संघात 162 मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहे. या मतदारांसाठी 13 नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिरपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी दिली आहे.
 
याकरीता शिरपूर विधानसभा मतदार संघातील 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या 162 एवढी आहे. यात 85 वर्षावरील 135 मतदार असून 27 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व वृद्ध मतदारांच्या घरी जावून मतदान घेतले जाणार आहे. यासाठी धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात 13 नोव्हेंबरला सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात येईल. तर या तारखेस अनुपस्थित असलेल्या मतदारांसाठी 16 नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहेत. त्यासाठी 10 पथके तयार करण्यात आली असून यापैकी 1 पथके राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक स्क्षूम निरिक्षक तर एक व्हीडीओग्राफर अशी 5 कर्मचाऱ्यांची टीम असणार आहे.

तरी शिरपूर विधानसभा मतदार संघातील ज्या 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा. तसेच यादिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना मतदानाची संधी नसेल. असेही निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी कळविले आहे. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने