निवडणूक काळात निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारीत करण्यास प्रतिबंध जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर




निवडणूक काळात निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारीत करण्यास प्रतिबंध जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर
 
      धुळे, दिनांक 25 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. त्यानुसार 13 नोव्हेंबर, 2024 रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) सर्व प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान, तर 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार बुधवार, दि. 13 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी 7.00 वाजेपासून ते बुधवार, दि.20 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालाचे अंदाज (एक्जीट पोल) प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, दूरदर्शन, आकाशवाणी अशा सर्व प्रसार माध्यमांवर प्रसारीत करण्यास प्रतिबंधीत केले आहे. त्यासंदर्भात अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने