ध्यास परिवर्तनाचा लढा स्वाभिमानाचा
होय मी लढणारच - डॉक्टर जितेंद्र ठाकूर
शक्ती प्रदर्शन करून उद्या भरणार पुन्हा उमेदवारी अर्ज
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक 2024 साठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या वतीने दिनांक 28 रोजी शुभ मुहूर्त साधत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आणि पुन्हा दिनांक 29 रोजी तालुक्यातील जनतेने मोठे शक्ती प्रदर्शन करत पण पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आयोजन केले असून दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिरपूर तालुक्याचे ग्रामदैवत खंडेराव मंदिरापासून उपजिल्हा रुग्णालय जवळील स्वर्गीय चंदन आबा यांच्या कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातील डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना समर्थन देऊन आशीर्वाद देणाऱ्या स्वाभिमानी जनतेला उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे तालुक्यातील जनतेने दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खंडेराव मंदिराजवळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. जितेंद्र ठाकूर त्यांनी केले आहे.
त्यामुळे जनतेने देखील या परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा आणि अन्यायाच्या विरोधात , तालुक्यातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
