शिरपूर तालुक्यातील मौजे फत्तेपुर गावाच्या महिला पोलीस पाटील यांना पदावरून दूर करा
फत्तेपूर ग्रामस्थांचे ग्रामस्थांचे निवेदन व मागणी
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील मौजे फत्तेपूर गावाच्या महिला पोलीस पाटील सौ. जयवंतबाई शांतीलाल पावरा यांना पोलीस पाटील पदावरून दूर करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी धुळे व उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे रीतसर पुराव्यानिशी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा सुरू असून अद्याप प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही यासाठी चौकशी देखील करण्यात आली आहे मात्र या चौकशीतून काय निष्पन्न झालं हे अद्याप समोर आलेले नाही.
या प्रकरणात शाळेने देखील बनावट आणि खोटे दाखले दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
सदरच्या तक्रारीत ग्रामस्थांकडून आरोप लावण्यात आले आहेत की संबंधित महिला पोलीस पाटील यांनी शासनाची दिशाभूल करून व शासनाचे नियम भंग करून पद प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यात आरोप लावण्यात आले आहेत की पोलीस पाटील पदासाठी पात्र व्यक्तीस फक्त दोन अपत्य असणे आवश्यक आहे , मात्र येथील पोलीस पाटील यांना चार अपत्य असून त्यापैकी तीन आपत्यांच्या पुरावा आम्ही शासनास सादर केला आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर पदाच्या मुदत वाढीसाठी उपविभागीय अधिकारी यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय या प्रकरणात सदर पोलीस पाटील यांचे आजोबा मौजे फत्तेपूर फॉरेस्ट तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावाचे रहिवासी नसताना देखील शाळेने खोटा दाखला संशोधन अधिकारी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती धुळे यांना दिला आहे. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वरील सर्व आरोपांच्या आधारे या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की सदर पदाची भरती करताना शासन नियमांच्या भंग झाला आहे, खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर करून पोलीस पाटील पद हे दिले गेले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांच्यावर फसवणुकीच्या गुन्हा दाखल करावा आणि त्यांना पदावरून कायमस्वरूपी करावे अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
सदरच्या निवेदनासोबत अनेक गावकऱ्यांनी सह्या केल्या असून निवेदनात आरोप केलेले सर्व पुरावे, मुलांचे शाळेचे कागदपत्र त्यांनी जोडले आहेत.
त्यामुळे या प्रकाराबाबत पुढे चौकशी होऊन काय निष्कर्ष निघतो आणि काय कारवाई होते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
वारंवार तक्रार आणि पाठपुरावा करून देखील शासन त्यावर कारवाई करत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता पुन्हा एकदा शासनास निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर देखील यावर निर्णय न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
