शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत लोकशाही जिवंत ठेवणार महाविकास आघाडी कडून जागेची मागणी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम




शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत लोकशाही जिवंत ठेवणार 

महाविकास आघाडी कडून जागेची मागणी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम 

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यासाठी विधानसभा निवडणूक 2024 ची तयारी सध्या विविध पक्षांकडून आणि संभावित उमेदवारांकडून केली जात आहे. तालुक्यात प्रामुख्याने महा येथे कडून भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी यांच्याकडून विधानसभेची तिकीट मिळणाऱ्या पक्ष सोबत सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहे. 

मात्र शिरपूर तालुक्यात असलेली राजकीय हुकूमशाही मोडीत काढत तालुक्यातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडे शिरपूर विधानसभेच्या जागेची मागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने ही जागा भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना सोडल्यास पक्ष ही जागा लढवण्याची तयारी करत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरपूर तालुक्यातील  शेतकरी,शेतमजूर कामगाराचा प्रश्नावर सन 1982 पासुन जोमाने काम करीत आहे.दिवंगत एडवोकेट मदन परदेशी यांनी कायद्याची पदवी संपादन करुन हिसाळे गावातुनच पक्षाची स्थापना करुन  शेतमजूरचा प्रश्नाना वाचा फोडली.
शेतकरी आणी शेतमजूर असा टोकाचा संघर्ष पेटला आणी अनेक केसेस कार्यकर्त्यांवर झाल्यात.त्याचळवळीच लोण तालुक्यात पसरल .
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 1990चा दरम्यान आदिवासी बांधवाचा  वनजमिनीचा प्रश्नावर आदिवासी बांधवाना किसान सभेचा नेतृत्वात तालुक्यातील बेकायदेशीर गोळा जाणारी फाळा पट्टी बंद करण्यासाठी रस्तातील लढाई 
सुरु केली.1992मध्ये आंबे ते सागंवी रेंज ऑफिसवर पहिला पायी मोर्चा मदन परदेशी,अर्जुन दादा कोळी,रामचंद्र पावरा,डाॅ.किशोर सुर्यवंशी.अँड.हिरालाल परदेशी,सुरेश परदेशी याच्या नेतृत्वात हा मोर्चा ऐतिहासिक ठरला आणी तालुक्यातील गोरगरीब आदीवासी बांधवांकडून फाॅरेस्ट विभागाकडून  दलाल कडुन बेकायदेशीर वसुल केली जाणारी फाळापट्टीचा बंदोबस्त केला.

 त्यानंतर आदीवासी बाधंवाचा वनजमिनी वाचविण्या साठी वेळोवेळी जन आंदोलन करण्यात आले. युपीए 1 चा केंद्र सरकारा कम्युनिस्टांनी 62खासदारांचा पांठीबा देतांना कोणतेही मंत्रीपद न घेता वनजमिन कसणार्या शेतकर्यासाठी वन हक्क अधिनियम 2006 हा कायदा पारित करण्यास भाग पाडले.

त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार  सी.के चंद्रप्पन वन जमीन कायदा समिती सदस्य  यांना तालुक्यातील चिचपाणी सारख्या छोट्याशा गावात आणुन हजोरा आदिवासी बांधवाचा मेळावा घेण्यात आला.

तालुक्यात कायदा झाल्याबरोबर एडवोकेट मदन परदेशी यांनी आदिवासी बांधवाना कायदा समजावा म्हणून मराठीत अनुवाद करून सरळ व सोप्या भाषेत पुस्तक प्रकाशित केले .वनजमिन चे फार्म देखिल कशाप्रकारे भरावेत यासाठी 
ठीकठिकाणी प्रबोधन करण्यात आले.
म्हणूनच आज बारा हजार पेक्षा जास्त  आदीवासी बाधवाना जे फॉर्म पर्यायी उतारा देण्यात आला.त्यासाठी किसान सभा  
व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठे योगदान आहे.त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वात 26,27,28 फेब्रुवारीत  2022 रोजी सागवी ते धुळे असा 80 की.मी पायी मोर्चा 
काढण्यात आला.तो यशस्वी देखिल झाला.त्या मोर्चामुळेच. बारा हजार वनजमिन धारकांना जे फार्म मिळाले.

 भारतीय कम्युनिस्ट पक्ष  व जनसंघटना वेळोवेळी जनेतेचा अनेक प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई लढण्यास कटिबद्ध असते.भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 1995 मध्ये अँड मदन परदेशी यानी पहिली विधान सभेची निवडणुक लढवली,सन 1999 चा निवडणुकीत शिवाजीराव पाटील याना पांठीबा दिला,2004 मध्ये काॅम्रेड रामचंद्र पावरा,यानी विधान सभेची निवडणुक लढवली,सन 2014 मध्ये गुमान भिल याना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उमेवारी देऊन निवडणुक लढवली,2019मध्ये उच्च शिक्षित उमेदवार विकास कालिदास सैदाणे याना उमेदवारी देऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवडणुक लढवली.
जि.प.,प.स.ग्राम पंचायत चा निवडणुक देखील ठिकठीकाणी उमेदवार उभे करुन निवडणुक प्रक्रियेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिरपूर तालुक्यात ताट मानेने उभा आहे .

करोना काळात जनेचा प्रश्नावर घरात न बसता सर्वात जास्त आदोंलन करणारा कम्युनिस्ट पक्ष हा ऐकमेव पक्ष होता .शासन स्तरावर त्याकाळात  भारतीय कम्युनिस्ट पक्षाची नोंद झाली होती .
भा.ज.प. ला खरा विरोधक शिरपूर तालुक्यात  भारतीय कम्युनिस्ट पक्षच आहे.गोरगरीब शेतकरी शेतमजूर,कामगार,आदिवासी ,आशा,गटप्रर्वतककाना एकत्र आणुन वेळोवेळी तीव्र प्रश्नांवर लढा देणारा एकमेव कम्युनिस्ट पक्ष आहे.

आजचा परिस्थितीत शिरपूर तालुक्यात कम्युनिस्ट पक्षाची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत.
शेकोडो कार्यकर्तै कम्युनिस्ट पक्षाने निर्माण केलेली आहेत.तालुक्यातील अनेक गावांत किसान सभा,शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शाखा अस्तित्वात आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष  हा जाहीरात बाजी करणारा पक्ष नाही. जाहिरातीसाठी पक्षा कडे पैसा देखिल नाही.!

असे असले तरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष विधान सभेची उमेदवारी चागल्या कार्यकर्त्यांस देऊन सक्षम पर्याय तालुक्यात उभा करु शकतो असा ठाम विश्वास असल्यामुळेच शिरपूर ची  विधान सभेची  जागेची मागणी महाविकास आघाडी कडे करण्यात आलेली आहे.

त्यासाठी गावा गावात जाऊन कार्यकर्त्यांचा भेटी गाठी घेणे सुरु आहे .काही झालेतरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेचा मुलभुत प्रश्नांसाठी जनतेचा पाठीशी खंबीर पणे उभा राहिल  अशी माहिती प्रसिद्धीसाठी अँड हिरालाल परदेशी.
    प्रदेशाध्यक्ष =महाराष्ट्र राज्य किसान सभा
कार्यकारणी सदस्य. भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र, यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने