शिरपूर : आर.सी.पटेल स्वायत्त अभियांत्रिकीत गरबा नृत्य सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी अभियांत्यांनी देखील सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘गरबा नाईट’ चे आयोजन करून गरब्याचा आनंद घेतला. यासाठी दांडिया आणि गरब्याची ३ दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पारंपारिक वेशभूषेत एकत्रित येत विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी झाल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
दांडिया आणि गरब्याची आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात गरबा नाईट या कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थी ‘रिफ्लेक्शन क्लब’ कडून तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गरबाच्या पारंपरिक नृत्यांचे प्रशिक्षण दिले गेले. क्लबने विविध कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके आयोजित करून विद्यार्थ्यांना नृत्याची तंत्रे शिकवली. यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मनापासून आनंद घेतला. यानंतर मुख्य कार्यक्रमाला
प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगरसेविका सौ. संगिता देवरे उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात शिरपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा व संस्थेच्या संचालिका सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते दुर्गा देवीची आरतीने झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, सौ. रिताबेन पटेल, सौ. रेशाबेन पटेल, सौ. शोभा भंडारी, संचालक अतुल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, डॉ. शारदा शितोळे (प्राचार्य, एच. आर. पटेल महिला महाविद्यालय शिरपूर), डॉ. वैशाली पाटील (संचालिका, आय. एम. आर. डी. कॉलेज शिरपूर), महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, स्टुडंट अफेर कमिटीच्या अधिष्टाता डॉ. अमृता भंडारी हे मान्यवर उपस्थित होते.
सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पारंपारिक वेशभूषेत महाविद्यालयाच्या प्रांगणावर एकत्रितपणे येत दांडियाच्या संगीतावर ताल धरला. या उत्साहपूर्ण वातावरणात आर. सी. पटेल अभियांत्रिकीने एखाद्या मोठ्या कटुंबप्रमाणे एकसाथ गरबा नृत्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सहभागीची निवड करण्यासाठी सौ. अरुंधती पाटील, श्रीमती दीपिका बागुल, हेमाक्षी ठाकरे स्पर्धेच्या परीक्षक होत्या. यात “उत्कृष्ट समूह गरबा स्पर्धा”, “उत्कृष्ट पोशाख” आणि ‘सर्वोत्कृष्ट नृत्य’ यांची निवड करण्यात आली. शिक्षक वर्गातून प्रा. मयूर पाटील, प्रा. हर्षल पाटील, प्रा. पूजा सराफ, प्रा. तेजल गिरासे यांची ‘सर्वोत्कृष्ट नृत्य’ यासाठी तर “उत्कृष्ट नृत्य जोडी” म्हणून डॉ. व्ही. एस. पाटील व श्रीमती जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली.
द्वितीय वर्षाचा रोहन जाधव, तृतीय वर्षाचा गौरव मोहकर व चतुर्थ वर्षाचा संदीप कंखरे या विद्यार्थ्यांची “गरबा किंग्स” आणि हर्षा दहीवदकर, साक्षी कुलकर्णी व भूमिका महाले या विद्यार्थिनीची “ गरबा क्वीन्स” म्हणून निवड करत यांना १ हजार रु. रोख पारितोषिक, “उत्कृष्ट पोशाख” असणाऱ्या तुषार खैरनार आणि ख़ुशी चौधरी यांना १ हजार रु. रोख पारितोषिक आणि प्रथम ‘सर्वोत्कृष्ट गटाला’ रु. ५ हजार पारितोषिक तसेच सर्व विजेत्यांना करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या गरबा नाईट कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
या विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या सुरळीत समन्वयासाठी रजिस्ट्रार डॉ. प्रशांत महाजन आणि स्टुडंट अफेर कमिटीच्या अधिष्टाता डॉ. अमृता भंडारी यांनी कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून विशेष मेहनत घेतली. विद्यार्थी समन्वयक वेदांत देशमुख, स्वयंसेवक म्हणून यश महाजन, ओजस पाटील, यश पाटील, नयन पाटील, अक्षय जैन, सिद्धेया सोनवणे, पंकज धनगर, तनमय विसपुते, यश चौधरी, जतिन पाटील आणि मितेश चौधरी या या विद्यार्थ्यांनी देखील योगदान दिले.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, डॉ. डी. आर. पाटील, डॉ. उज्वला पाटील, डॉ. एस. ए. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. एम. पी. जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.


