लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाचा अध्यक्षपदी राजकिरण राजपूत यांची बिनविरोध निवड*






*लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाचा अध्यक्षपदी राजकिरण राजपूत यांची बिनविरोध निवड*

*शिरपूर तालुक्यातील आढे येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय,आढे ता.शिरपूर जि.धुळे या संस्थेची कार्यकारी मंडळाची सभा नुकतीच ग्रंथालयाचा कार्यालयात मावळते अध्यक्ष रणजितसिंग वि.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यात पोलीस पाटील राजकिरण राजपूत यांची अध्यक्षपदी व रणजितसिंग राजपूत यांची सचिवपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.*
      *उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्षपदी अजितसिंग राजपूत,सदस्यपदी वेणूबाई राजपूत,अशोक राजपूत,चंद्रसिंग गिरासे,देविसिंग पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.मंजूर असलेल्या घटना व नियमावलीनुसार संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी सन २०२४ ते २०२९ या पाच वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती दक्षा गिरासे यांनी काम पाहिले.सभा यस्वितेसाठी सहायक आशा राजपूत यांनी परिश्रम घेतले.निवडीबद्दल नेहरू युवा केंद्र-धुळे,क्षत्रिय शिवराणा बहुुद्देशिय संस्था-आढे,धुळे जिल्हा व शिरपूर तालुका ग्रंथालय संघ,धुळे जिल्हा व शिरपूर तालुका पोलीस पाटील संघ,मराठा कुणबी पाटील बहुउद्देशिय संस्था-तऱ्हाडी,आदींनी अभिनंदन केले आहे.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने