परराज्यातील व्यापारी गांजा खरेदीसाठी तालुक्यात, तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात
शिरपूर प्रतिनिधी - मागील काही काळापासून गांजा लागवड आणि शिरपूर तालुका यांचे एक समीकरण बनले आहे. पोलीस प्रशासनाकडून अनेक वेळा धडक कारवाया करून देखील चोरट्या मार्गाने गांजा लागवड तालुक्यात केली जाते. आता तालुक्याची गांजा कनेक्शन हे इतर राज्यांच्या व्यापाऱ्यांची देखील जोडले जात आहे.
अशाच प्रकारे गांजा करण्यासाठी परराज्यातून काही व्यापारी तालुक्यात येत असल्याचे गोपनीय माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रथम तयार करून या सर्वांना ताब्यात घेत हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
तालुक्यातील रोहीणी, भोईटी, लाकड्या हमुमान या परीसरात कर्नाटक व मध्यप्रदेश येथील काही व्यापारी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा अंमलीपदार्थ (सुकलेला गांजा) विकत घेण्यासाठी दोन दिवसापासून आले आहेत. सदर व्यापाऱ्यांना भोईटी गावातील काही इसम मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा अंमलीपदार्थ / सुकलेला गांजा विक्री करणार आहेत अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. यावर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन संशयित
ठिकाणी छापा कारवाई केली असता सुळे फाट्या पासुन दोनच मिनीटाच्या अंतरावर जंगलात रस्त्याचे बाजुला 2 मोटार सायकली व पाच इसम संशयीत रित्या थांबलेले दिसले. त्यातील एका मोटार सायकलवर दोन इसम बसलेले असुन त्यांचे मध्ये एक पांढ-या रंगाची गोणी ठेवलेली दिसली. तसेच दुस-या मोटार सायकलवर एक इसम पाठीवर सेंक बॅग लावलेला दिसला. व अन्य दोन ईसम दोन्ही मोटार सायकलीजवळ उभे दिसले. सदर पाचही इसम एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी सदर पाच इसमांना पोलीस आल्याचे संशय झाल्याने ते तेथुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानांच 1) अब्दुलाखान खादरखान पठाण वय 25 वर्षे रा. दांडेली जि. कारवाल राज्य कर्नाटक 2) संजय केसराम पावरा वय 22 वर्षे रा. भोईटी पोस्ट रोहिणी ता. शिरपुर जि. धुळे 3) इराम डोंगरिया सेनानी वय 20 वर्ष रा. मोहल्या ता. नेवाली जि. बडवानी यांना पकडले व दोन ईसम पळुन गेले. पो.नी. जयपाल हिरे यांनी पंचासमक्ष पकडलेल्या तीन्ही ईसमांची सोबत आणलेल्या वाहनांच्या लाईटच्या उजेडा मध्ये सोबत आणलेल्या पंचासमक्ष अंगझडती घेतली असता संजय केसराम पावरा याचे कमरेला एक गावठी बनावटीचा कटटा (पिस्टल) व पॅन्टच्या खिश्यात 2 जिवंत काडतुस मिळुन आले. सदर ईसमां सोबत असलेल्या पांढऱ्या रंगाची गोणी व सेंक बंग उघडुन पाहता त्यामध्ये गांजा सदृष्य वनस्पती दिसुन आली. त्यात
1) 2,06,010/- रुपये किमतीचा एका पांढऱ्या रंगाच्या प्लॉस्टीक गोणीत व निळयासर रंगाची सॅक बॅग मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा हिरवट ओलसर, पाने, बिया, फुलं असा गांजासदृश्य अंमली पदार्थ एकुण 29किलो 430 ग्रॅम कि. अं.
25,000/-रुपये किंमतीचा एक चंदेरी रंगाचा लोखंडी धातुचा गावठी कटटा (पिस्टल)
2000/- रुपये किमतीचे एकुण 02 पिवळया धातुचे जिवंत काडतुस (राऊंड)
1,50,000/- रुपये किंमतीची एक यामाहा कंपनीची एम.टी.-15 मॉडेलची विना नंबरची मोटार सायकल
1,50,000/- रुपये किंमतीची एक यामाहा कंपनीची एम.टी.-15 मॉडेलची विना नंबरची मोटार सायकल असा
एकुण किंमत 5,33,010/- रुपयाचा मुददेमाल मोटार सायकलसह जप्त करण्यात आला. याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. 266/2024 एन डी पी एस ट्रेक्ट चे कायदा कलम 8 20(क) (क)व 22 (क), सह ऑर्म अॅक्ट कायदा कलम 3/25, सह महा. पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) (3) चे उल्लघंन 135 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.
गुन्ह्यातील अटक आरोपींना 02 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उप
विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग शिरपुर भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई मनोज कचरे, पोसई मिलीद पवार, ग्रे. पोसई जयराज शिंदे पोहेकॉ/संतोष पाटील, पोहेका / संदिप ठाकरे, पोका / योगेश मोरे, पोकॉ/ संजय भोई, पोकॉ/ स्वप्निल बांगर, पोकॉ जयेश मोरे, पोकों/ सुनिल पवार, पोकों/ भुषण पाटील, पोकॉ/ मनोज नेरकर, पोकों/ कृष्णा पावरा, पोकों/ धनराज गोपाळ चापोहेकॉ/ अल्ताफ मिर्झा, चापोकों/इसरार फारुकी यांनी केली आहे.
