*प्रित्रेश्वर काॅलनी परिसरात श्रीगणेश चतुर्थीचे कीर्तन उत्साहात संपन्न*
शिरपूर— प्रित्रेश्वर काॅलनीत स्वराज बालगणेश मित्र मंडळातर्फे श्रीगणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक वातावरणात श्रीगणेशा स्थापनेच्या पहिल्या दिवशी श्री गणेशा समोर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले दि.07 सप्टेंबर 2024 रोजी रात्री09 वा.*किर्तनकार ह.भ.प.भुषण महाराज आंबाप्रिंपीकर* यांनी आपल्या मधुर वाणीतुन सर्व गणेश भक्तांना भगवंताची महिमा व श्रीगणेशाची महत्व,महिमा गायन करत सर्व भक्तांना संसाराचे दाखले देत मंत्रमुग्ध करुन घेतले या किर्तनास शिरपुर तालुक्यातील तर्हाडी,जवखेडा,आमोदा, विखरण,करवंद भजनी मंडळी व शिरपुर शहरातील पाटीलवाडा,करवंद नाका,रथगल्ली वरचेगाव भजनी मंडळींनी साथ दिली तसेच या प्रसंगी भागवताचार्य ह.भ.प.प्रमोद भोंगे महाराज,किर्तनकार ह.भ.प.चंद्रकांत महाराज अर्थेकर,अध्यात्मिक संघटना शिरपुर शहराध्यक्ष ह.भ.प.संतोष माळी वरवाडेकर उपस्थित होते तसेच प्रित्रेश्वर काॅलनी परिसरातील सर्व गणेश भक्तांनी किर्तन श्रवणाचा आनंद घेतला जय हरी,जय गजानन,श्रीगणेश नम: आयोजक— स्वराज बाल गणेश मित्र मंडळ व प्रित्रेश्वर काॅलनी परिसर शिरपुर
